लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आईस्क्रीम खायला खूप जास्त आवडते. आईस्क्रीमचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये आईस्क्रीम आवडीने खाल्लेले जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि दातांच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी आईस्क्रीम खाण्याचा सल्ला दिला जातो. बाजारात अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आणि ब्रँडचे आईस्क्रीम उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला जगातील सगळ्यात पहिले आईस्क्रीम कोणी आणि कधी बनवले होते? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर आणून घेऊया थंडगार आईस्क्रीमचा इतिहास. (फोटो सौजन्य – istock)
जगातील सगळ्यात पहिले Ice cream कोणी आणि कोणत्या देशात बनवण्यात आले?

आईस्क्रीमचा इतिहास साधारण 2,500 वर्षांपूर्वीचा आहे. पूर्वीच्या काळी उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी थंड आणि गोड पदार्थांचा वापर केला जायचा. तर काही ठिकाणी १७व्या शतकातील इटली आणि फ्रान्सचा आईस्क्रीम बनवण्याचा इतिहास सांगण्यात आला आहे.

इ.स.पू. ५५० च्या सुमारास फारस म्हणजे आताच्या इराण मध्ये आईस्क्रीम बनवण्यात आले होते. साठवून ठेवलेल्या बर्फापासून फळांचे शरबत, शोरबे आणि ‘फलूदा’ यांसारखे चविष्ट पदार्थ बनवण्यात आले होते.

आधुनिक तंत्रज्ञाच्या मदतीने सीरियामध्ये ‘बूझा’ आणि फारसमध्ये ‘बस्तानी’सारखी चिवट आईस्क्रीम तयार करण्यात आले होते. त्यानंतर चीनने तांग राजवटीत ‘सुशन’ नावाची गोठवलेली मिठाई तयार केली.

१५५८ मध्ये नेपल्स येथे जियाम्बातिस्ता डेला पोर्ता यांचे ‘माजिया नातुरालिस’पुस्तक प्रकाशित झाले. ज्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट मिसळून द्रव पदार्थ झपाट्याने थंड करण्याची पद्धत सांगण्यात आली आहे.

१७ व्या शतकात मीठ, पाणी आणि बर्फ यांच्या मिश्रणाचे प्रयोग करण्यात आले. त्यानंतर अल्बर्टो लातिनी यांनी १६९४ मध्ये ‘द मॉडर्न स्टुअर्ड’ या पुस्तकात दूध, साखर आणि फळांपासून बनवलेल्या ‘मिल्क सोरबे’ची रेसिपी लिहिली आहे.






