बंडखोरी शमविण्यासाठी अखेरपर्यंत नेत्यांची धावपळ; राजकारण जिंकलं; भावना हरल्या !
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना मोठा दिलासा; ‘त्या’ प्रकरणात ठरले दोषमुक्त
भाजपा पक्षामध्ये सर्वाधिक इच्छुकांची संख्या होती. उमेदवारी न मिळाल्याने आणि डावलली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. अशीच काहीशी परिस्थिती इतर पक्षांमध्ये देखील आहे.
अधिकृत उमेदवाराव्यतिरिक्त इतर उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागले. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने काम करूनही उमेदवारी न मिळाल्याने काही कार्यकर्त्यांमध्ये तीव्र भावना उमटल्या. भाजपातील काही इच्छुकांनी उमेदवारी माघार घेतली. या वेळी त्यांना अश्रू अनावर झाले. नॉर्थकोटच्या आवारात हे भावनिक दृश्य पाहायला मिळाले.
काही प्रभागांत उमेदवारांची संख्या कमी असल्याने जागा बिनविरोध करण्याच्या उद्देशाने भाजपने प्रयत्न केले, मात्र ते अपयशी ठरले. परिणामी सोलापूर महापालिकेतील एकही जागा बिनविरोध न होता सर्वच्या सर्व १०२ जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान माजी नगरसेवक जगदीश पाटील यानीही आपला उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले, गेल्या ४० वर्षापासून एकनिष्ठवणे मी भाजपाशी जोडून आहे. मात्र उमेदवारी न मिळाल्याने पक्षासाठी मी अर्ज माघारी घेतला. अन्याय झाला का असे विचारताच ते भावनिक झाले, त्यांना अश्रू अनावर झाले.
भाजपाचे आमदार देवेंद्र कोठे यानी शिवसेनेच्या कुमुद अंकारम यांना आपला उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले, भाजपाने डावलल्याने कुमुद अंकाराम यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांना अर्ज माधारी घ्यायला लावण्यासाठी शुक्रवारी नॉर्थकोट येथे आमदार देवेंद्र कोठे स्वतः आले आणि अर्ज माघारी घ्यायला लावला.
भाजपातील ज्येष्ठ नेते व माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग दिल्ली, प्रभाकर जामगुंडे या दोघांनीही अखेर पक्षाचे आदेश पाळत आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. पक्षाने इतर नवीन उमेदवारास संधी दिली. या प्रभागात सुमारे १५ हजार तेलगू भाषिक मतदार आहेत. यामुळे पक्षाने ही चूक केली आहे. अशी प्रतिक्रिया दिड्डी यांनी दिली.






