फोटो सौजन्य: सोशल मीडिया
अनंत चतुर्दशीच्या दिवशी देशभरात गणेश विसर्जन झाले आहे. लोकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत आशेने लोक आश्रूच्या डोळ्यांनी गणपती बाप्पाला निरोप सर्वत्र निरोप देण्यात आला. तुम्ही सोशल मीडियावर बाप्पाच्या निरोपाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. लोक अगदी बाप्पाच्या मिरवणुकीत मग्न होऊन जातात. पाणवलेल्या डोळ्यांनी बाप्पाचे विसर्जन करतात. सगळ्यांनी असंख्य भावना मनात घेऊन बाप्पाला निरोप दिलेला आहे.
दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर मुंबई पोलीस बँड खाकी स्टुडिओने देखील बाप्पाला निरोप दिला. त्यांनी संगीतमय अशी मानंवंदना भगवान गणेशाला वाहिली. मुंबई पोलिस बँडचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस पडत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकजण भावनिक झाले आहेत. पोलीस बँडने गणपती बाप्पाला अतिशय मनमोहक पद्धतीने निरोप दिला आहे.
मुंबई पोलिसांनी बाप्पाला दिला संगीतमय निरोप
मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्रामवर बाप्पाच्या निरोपाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘खाकी स्टुडिओकडून बाप्पाला निरोप. अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर मुंबई पोलिस बँडच्या खाकी स्टुडिओचा शानदार परफॉर्मन्स.’ व्हिडीओमध्ये एक गणवेशधारी पोलीस अधिकारी बँडसमोर उभे राहून बँडची धून दिग्दर्शित करत असल्याचे तुम्ही पाहू शकता. बँड आपल्या सुरात बाप्पाला संगीतमय पद्धतीने निरोप देत आहेत. बँडने “एकदंताय वक्रतुंडाय” हे भक्तिगीत वाजवले आहे. मुंबई पोलीस बँडची धून ऐकून सगळेजण मंत्रमुग्ध झाले. हा व्हिडीओ सर्वत्र मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत आहे.
व्हिडीओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
मुंबई पोलिस बँडचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांना आवडला आहे. हा व्हिडीओ हजारोहून अधिक लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. तसेच बँड पोलिस अधिकाऱ्यांचे लोक कौतुक करत आहेत. एका युजरने पोस्टवर कमेंट केली की, ‘हे लोक गणवेशात उभे आहेत, त्यामुळे गर्दीत सण साजरा केला जाऊ शकतो.’ दुसरा म्हणाला, ‘बाप्पाला खरा निरोप, एक उत्तम कामगिरी.’ तर आणखी एकाने ‘सणांच्या काळात आमच्या सुरक्षेबद्दल मुंबई पोलिसांचे आभार.’ तसेच अनेकांनी व्हिडीओवर गणपती बाप्पा मोरया देखील म्हटले आहे. काही लोकांनी बाप्पा चालले म्हणत रडण्याचा इमोजी शेअर केला आहे.