स्मृती मानधना आणि मेग लॅनिंग(फोटो-सोशल मीडिया)
RCB W vs UPW W : आज महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने येणार आहेत. नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात आरसीबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर यूपी वॉरियर्स प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या हंगामात विजयी सुरूवात केली असून यूपी वॉरियर्सला मात्र पहिल्या विजयाच्या शोधात आहे.
टॉस जिंकल्या नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मानधनाने प्रतिक्रिया देत म्हटले की, “आम्ही आज प्रथम क्षेत्ररक्षण करू इच्छितो. आम्ही पाहिले आहे की डावाच्या उत्तरार्धात दव पडतो, आणि आम्ही मागील सामना देखील लक्ष्याचा पाठलाग करून जिंकला होता. डीवाय पाटील मैदान हे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अनुकूल असे आहे, कोणतीही धावसंख्या पुरेशी नसते, तुम्ही किती धावांचा पाठलाग करत आहात हे माहित असणे नेहमीच सोपे असते. नादिनने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये आम्हाला खूप मदत केली, हे योगदानाबद्दल आहे आणि आम्ही सर्वजण योगदान देऊ इच्छितो. एक बदल – प्रेमाच्या जागी गौतमी संघात आली आहे.”
टॉस गमावणारी यूपी वॉरियर्स संघाची कर्णधार मेग लॅनिंगने म्हटले की, “आम्हीही प्रथम क्षेत्ररक्षणच निवडले असते. आम्ही एकत्र एक चांगला आठवडा घालवला आहे, पहिला आठवडा थोडा धावपळीचा असतो. आम्ही संघात कोणताही बदल केलेला नाही.”
हेही वाचा : WPL 2026 मध्ये प्रेक्षकांना नो एंट्री! BCCI च्या निर्णयाने आश्चर्य व्यक्त; ‘हे’ कारण आले समोर…
यूपी वॉरियर्स महिला (प्लेइंग इलेव्हन): किरण नवगिरे, मेग लॅनिंग (क), फोबी लिचफिल्ड, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, श्वेता सेहरावत (डब्ल्यू), डिआंड्रा डॉटिन, सोफी एक्लेस्टोन, आशा शोभना, शिखा पांडे, क्रांती गौड
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (क), दयालन हेमलता, गौतमी नाईक, रिचा घोष (डब्ल्यू), राधा यादव, नादिन डी क्लार्क, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल






