महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आकर्षित जाहीरनामा प्रसिद्ध केले आहते (फोटो - सोशल मीडिया)
नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीची (Maharashtra Local Body Elections) रणधुमाळी सुरू असून प्रचार आता अंतिम टप्यात आला आहे. भाजपा, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शिवसेना (शिंदे गट), शिवसेना उबाठा आदी पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. भाजपाने इंदौर पॅटर्नचा संकल्पना प्रकाशित केला आहे, तर काँग्रेसने नांदेडच्या (Nanded News) विकासाचे आश्वासन दिले आहे. भाजपाच संकल्पनाम्याला उत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नागपूर, पिंपरी चिंचवड, बारामती पॅटर्नचा वचननामा प्रकाशित करुन सत्तर वर्षापासून नांदेडमध्ये साचलेली राजकीय घाण साफ करण्याचे आवाहन केले आहे.
राजकारणात सामान्य जनता मात्र भरडली गेली आहे. जाहीरनाम्याच्या माध्यमातून घसा कोरडा करून ओरडणाऱ्या राजकीय पक्षांच्या संकल्पनेतील आश्वासित ‘विकास’ सामान्य जनतेपर्यंत पोहोचायला किती काळ लोटेल?, असा प्रश्न नागरिक एकमेकांना विचारत आहेत.
मनपा निवडणुकीच्या निमिताने भाजपाने माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘आम्ही जिंकणारच’ असे म्हणत कलरफुल गुळगुळीत संकल्पनापत्र मतदारांसमोर ठेवले आहे. यात अनेक कामे काँग्रेसमध्ये असतानाच केलेली आहेत, तीच कामे नये या रूपात मांडण्याचा प्रयत्न भाजपाने या संकल्पनाम्यात केला असून अनेक चांगली आश्वासने या संकल्पनाम्यात देण्यात आली आहे. संकल्पनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विश्वासक आश्वासक अशी ‘मोहर ‘जाहीर सभेत उमटविली आहे.
हे देखील वाचा : कीर्तन कार्यक्रमावरुन परताना काळाचा घाला! अपघातात तीन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
निर्धार आमचा साथ तुमची
याच संकल्नपाम्याची कॉपी काँग्रेसने केल्याचा आरोप भाजपाने केला असून काँग्रेसने काँग्रेस सरकारने दिलेल्या निधीतून शहरात काम झाली आहेत, ती आम्ही वचननाम्यात दाखवली आहेत, असे म्हटले आहे. काँग्रेसने केलेला विकास हीच आमची ओळख असेही कोंग्रेसने वचननाम्याच्या मुखपृष्ठावर म्हटले आहे, वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केल्यामुळे काँग्रेसची बाजू भक्कम झाली असल्याचे खासदार रविंद्र वव्हाण यांनी म्हटले आहे. भाजप इंदौरच्या धर्तीवर नांदेडमध्यै विकास करण्याचा संकल्प केला असून काँग्रेसने मात्र शाश्वत विकास हाच आमचा ध्यास असे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नुकतेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आपला विकासनामा प्रकाशित केला असून निर्धार आमचा साथ तुमची असे म्हटले आहे. तसेच नांदेडचा कारभारी बदला असा नाराही दिला आहे.
हे देखील वाचा : नांदेडच्या विकासाची जबाबदारी माझी…; खासदार अशोक चव्हाण यांचे भर सभेमध्ये नांदेडकरांना वचन
अनेक चुकांचा पंचनामा संकल्पनामा
वचननामा, विकासनामा अशी वेगवेगळ्या गुळगुळीत शब्दांची फिरवाफिरवी करत भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मतदारांना साद घातली आहे. आश्वासनांची थंडीत बरसात करत काढलेल्या कोणाच्या विकास पुस्तिकेवर नांदेडकर विश्वास दाखविणार? हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. विकासनाम्यात झालेल्या अनेक चुकांचा पंचनामा भाजपने पत्रकार परिषद घेऊन केला खरा, परंतु हा प्रयोग माध्यम प्रतिनिधींनी प्रश्नांचा भडीमार केल्यामुळे अंगलट आल्याचे दिसून आले. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आपआपले जाहीरनामे प्रकाशित केले असताना शिवसेनेचे उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी शहराच्या विकासासाठी गतिशील विचार विकासात्मक धोरण असा नारा देत विकासाप्रती असलेली कटिबध्दता दाखवून दिली आहे. आ. कल्याणकर यांनी दिलेला ‘जनता माझी मी जनतेचा हा संदेश घरोघरी पोहचविण्याचे काम शिवसैनिकांकडून केले गेले आहे. मनपाच्या सतेची ‘मास्टर की” आ. कल्याणकर याच्याकडे राहिल? असे मत अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.






