(फोटो सौजन्य – X)
मंगळवारी २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मोठा दहशतवादी हल्ला करण्यात आला. हा हल्ला इतका भीषण होता की याने संपूर्ण देशच काय तर जगही हादरले. माहितीनुसार हल्लयात, २६ हुन अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना प्रमुख लक्ष्य केले. लोकांना अक्षरशः त्यांचे नाव आणि धर्म विचारात त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच आता यासंबंधीतला आणखीन एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे.
पाकिस्तानचे अनेक घृणास्पद व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. मात्र आता जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याने पाकिस्तानच्या विषारी मानसिकतेची पुन्हा एकदा ओळख करून दिली आहे. ब्रिटनमधील पाकिस्तान उच्चायुक्तालयाबाहेर भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण निदर्शने केली. मात्र यावेळी पाकिस्तानी अधिकाऱ्याने जे केले त्याने सर्वांचेच लक्ष वेधले. विद्यार्थी आंदोलन करत असताना पाकिस्तानी कर्नल तैमूर यांनी बाल्कनीत उभं राहून भारतीय विद्यार्थ्यांना गळे कापण्याची धमकी दिली. त्यांचे हे कृत्य लज्जास्पदच नाही तर घृणास्पदही आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होताच आता देशात (भारतात) संतापाची लाट उसळली आहे.
🚨SHOCKER: Pakistan Diplomat’s gesture towards Indians in London: “Will slit your throat!”
👇🏼: Read more
A Pakistani diplomat, Colonel Taimur Rahat, has ignited widespread condemnation after making a throat-slitting gesture toward Indian protesters outside the Pakistan High… pic.twitter.com/MgT4w5pOD5
— truth. (@thetruthin) April 26, 2025
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, पाकिस्तानी कर्नल तैमूर बाल्कनीत उभे असल्याचे दिसून येते. यावेळी त्यांच्या हातात भारतीय लष्करी अधिकारी अभिनंदन यांचे एक पोस्टर असते. मात्र हद्द तर तेव्हा पार होते जेव्हा तो पुढच्याच क्षणी समोर उभ्या असलेल्या भारतीयांकडे बोट दाखवितो आणि मग गळ्यावर हात ठेवत त्यांना जीवे मारण्याची धमकी देतो. भारतीय समुदायातील लोकांचा राग रास्त होता. ते फक्त त्या दहशतवादी हल्ल्याविरुद्ध आवाज उठवत होते ज्यामध्ये निष्पाप भारतीयांचा बळी गेला. ते हातात ‘मी हिंदू आहे’ असे पोस्टर घेऊन शांततेत निषेध करत होते. पण पाकिस्तान उच्चायुक्तालयाने तिथे मोठे स्पीकर्स बसवले, गाणी वाजवली आणि अश्लील घोषणा दिल्या जेणेकरून भारतीयांचा आवाज दाबता येईल.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.