(फोटो सौजन्य – X)
सोशल मीडियावर अनेक थरारक आणि धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील दृश्ये कधी आपल्याला धक्का देतात तर कधी हैराण करून सोडतात. आताही असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यातील दृश्यांनी सर्वच हादरून गेले. आपण जे पाहतो ते खरं असतंच असं नाही हे तर तुम्ही अनेकदा ऐकले असेल. याचेच जिवंत उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यातील दृश्ये तुम्हाला आश्चर्याचा धक्का देतील. वास्तविक, गर्लफ्रेंडसोबतच्या वादात प्रियकराने एवढे मोठे पाऊल उचलले की ते पाहून सोशल मीडिया युजर्स हादरले पण खरा ट्विस्ट तर तेव्हा आला जेव्हा खरं सत्य समोर आलं. आता यात नक्की काय घडलं ते चला आपण सविस्तर जाणून घेऊया.
तरुणाने चुकीचा स्पर्श केला अन् इन्फ्लूएन्सरने खणकन लगावली थोबाडीत; मग पुढे जे घडलं… Live Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये एका हॉटेलमधील दृश्य दिसून आले ज्यात एका मुलाचा आपल्या प्रेयसीसोबत वाद सुरु होता. यादरम्यान, तो मुलगा अचानक भडकतो आणि थेट बाजूच्या खिडकीतून उडी मारतो. त्याचे हे कृत्य पाहून गर्लफ्रेंडसह सर्वच हादरून जातात. मात्र पुढे एक मेजदार घटना घडून येते, जी सर्वांनाच हैराण करते. मुलाला खिडकीतून उडी मारताना पाहून लोकांना वाटतं की तो एखाद्या उंच इमारतीचा मजला असावा जिथून तो मुलगा उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असावा. पण जेव्हा आपण व्हिडिओमध्ये सीसीटीव्ही फुटेजचा दुसरा भाग पाहतो तेव्हा आपल्याला तो मुलगा तळमजल्याच्या खिडकीतून बाहेर पडताना दिसतो आणि बाहेर पडल्यानंतर तो मुलगा लगेच उठतो आणि वेगाने पळून जातो.
This Chinese man jumped through a hotel window after getting into a heated argument with his girlfriend 👀😳pic.twitter.com/0EgX1BnIw9
— Daily Loud (@DailyLoud) April 25, 2025
दरम्यान ही घटना चीनमध्ये घडली असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ @DailyLoud नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘या चिनी माणसाने त्याच्या प्रेयसीशी झालेल्या वादानंतर हॉटेलच्या खिडकीतून उडी मारली’ असे लिहिले आहे. व्हिडिओच्या कमेंट्समध्ये अनेकांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “मला आश्चर्य वाटते की ते कशाबद्दल वाद घालत असावे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हॉलिवूड स्टंटमॅन होण्याचे त्याचे स्वप्न असावे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.