आता लोणावळ्याला न जाताच पोहोचता येणार पुण्याला (फोटो - सोशल मीडिया)
आपल्या देशामध्ये देशांतर्गत प्रवासासाठी आणि स्वस्तात लांबच्या पल्लाचा प्रवास करणाऱ्यासाठी रेल्वेचा प्रवास केला जातो. अनेक भारतीय आजही रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. बहुतेक मध्यमवर्गीय दररोज देखील रेल्वेने प्रवास करतात. देवदर्शनासाठी आणि सुखकर प्रवासासाठी लोक आधीच गाडीची तिकीट काढून ठेवतात. पण ही तिकीट काही प्रमाणामध्ये काढली जातात. एका पठ्याने तर चक्क पूर्ण रेल्वेच बुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर रेल्वेच्या एका तिकिट काढल्याची व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये चक्क एका व्यक्तीने एक दोन किंवा दहा नाही तर पूर्ण रेल्वे बुक केल्याचे समोर आले आहे. वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी एका व्यक्तीने संपूर्ण ट्रेन बुक केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बनवताना एका यूजरने त्याच्याशी संबंधित माहितीही दिली आहे. मात्र नेटकऱ्यांनी जोरदार कमेंट केल्या असून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक रेल्वे पूर्णपणे रिकामी जात असल्याचे दिसत आहे. तसेच या रेल्वेवर तिचे नाव व नंबर देखील नाही. यामध्ये व्हिडिओ काढणारी ती व्यक्ती सांगत आहे की कोणीतरी वैयक्तिक ट्रेन बुक केली आहे. ज्यावर नाव किंवा नंबर लिहिलेला नाही. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती सांगत आहे की कोणीतरी नवीन ट्रेन बुक केली आहे. ज्यावर नाव सुद्धा लिहिलेले नाही.
ही ट्रेन उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथून जम्मू कटराकडे निघाली होती. जे डॉ. राकेश तिवारी यांनी 22 ते 24 डिसेंबर दरम्यान बुक केले होते. व्हिडिओमध्ये, बुक केलेली वैयक्तिक ट्रेन प्लॅटफॉर्मवरून जात असल्याचे रेकॉर्ड करण्यात आले आहे. ज्याला इंस्टाग्रामवर आतापर्यंत 2 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत की, संपूर्ण ट्रेन बुक करण्यासाठी माणूस इतका श्रीमंत असावा लागतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या तुफान कमेंट्स
संपूर्ण ट्रेनच्या बुकिंगचा हा व्हायरल व्हिडिओ पाहून लोक जोरदार कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की ते कुटुंब आहे की जिल्हा. तर दुसऱ्याने लिहिले आहे की भारतात लोकांकडे पैशांची कमतरता नाही. तिसऱ्या नेटकऱ्याने सांगितले की, केवळ कुटुंबच नाही तर संपूर्ण जिल्हा यामधून जात आहे. कोणत्याही स्टेशनवर थांबणार नाही का, असा सवाल एकाने केला आहे. तर एका नेटकऱ्याने लिहिले आहे… फारुखाबादचे डॉ. राकेश तिवारी जी आम्हाला दरवर्षी वैष्णो देवीचे दर्शन घडवतात. जय माता दी, अशा कमेंट केल्या आहेत.