चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती मोबाईलच्या दुकानाच्या बाहेर उभा आहे. हा चोरटा तोंडाला पंतप्रधान मोदींचा मास्क लावून आहे. त्याच्याकडे एक लोखंडी सळी असून तो दुकान उघडण्याचा प्रयत्न करत आहे. तिथेच उभी असलेल्या गाडीकडे जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चोरांनी दुकानातून मगाड्या मोबाईलचे बॉक्स रिकामे केले होते. सर्व सामान अस्ताव्यवस्त टाकले होते. सकाळी जेव्हा मालक नेहमीप्रमाणे दुकान उघडायला आला तेव्हा दुकानाचे कुलूप तुटल्याचे त्याच्या लक्षात आले.
यानंतर त्याने दुकानाची पाहणी केली. सर्व सामान गायब असल्याचे पाहताच त्याने तातडीने पोलिसांकडे याची तक्रार दाखल केली. तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यावेळी पोलिसांना आणखी एका दुकानातून चोरी केल्याचे समजले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर मात्र पोलिस चक्रावून गेले होते. या चोरट्यांनी थेट पंतप्रधान मोदींचा मास्क घालून चोरी केली होती. यामुळे त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. तिसऱ्या एका दुकानातही त्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना कुलूप तोडता आले नाही.
राजस्थान के भीलवाड़ा में चोर, नरेंद्र मोदी का मुखौटा लगाकर आए और दुकान से 40 मोबाइल चुराकर ले गए !! pic.twitter.com/jZWfdEjWcW — Sachin Gupta (@Sachingupta) June 30, 2026
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Sachingupta या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने आता हेच बघायचं बाकी होतं असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने साला चोर पण स्मार्ट झालेत असे म्हटले आहे. अशा विविध मजेशीर प्रतिक्रिया लोक देत आहेत.
व्यक्तीला हवेत उडवलं, तब्बल ८ वेळा पायदळी तुडवलं; LIVE शोमध्ये बेभान बैलाचा थरारक हल्ला! Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






