मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) पुन्हा एकदा बोहल्यावर चढली आहे (Second Merriage). राखी सावंतने प्रियकर आदिलसोबत (Boyfriend, Adil Durrani) लग्नगाठ बांधली आहे. लग्नाच्या घोषणेसोबतच राखीने बॉयफ्रेंड आदिलबाबतही एक मोठा खुलासा केला आहे, जो ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. राखी सावंतने आदिलशी लग्न करून ७ महिने उलटून गेले आहेत पण आता तिने हे गुपित उघड केले आहे.
[read_also content=”राखीचा धक्का देणारा निर्णय! रुग्णालयात आईवर सुरू आहेत उपचार, दुसऱ्यांदा बोहल्यावर चढली, बॉयफ्रेंड आदिलसोबत बांधली लग्नगाठ https://www.navarashtra.com/viral/shocking-rakhi-sawant-married-to-boyfriend-adil-durrani-in-court-wedding-photos-goes-viral-361020.html”]
तिच्या लग्नाची चर्चा करताना राखी म्हणाली – माझे लग्न होऊन ७ महिने झाले आहेत. आदिलने मला लग्न झालं असल्याचं लपवून ठेवायला सांगितले. आमचे कोर्ट मॅरेज झाले आहे. निकाहही झाला आहे. मी आता सांगत आहे, कारण ते सांगणे आवश्यक आहे. माझ्या आयुष्यात काहीही चांगलं होत नाहीये. राखीने सांगितले की, तिने आता तिचे आणि आदिलचे लग्न झाल्याचं सर्वांसोबत शेअर केले आहे कारण तिला शंका आहे की आदिलचे बिग बॉस मराठी स्पर्धकासोबत अफेअर सुरू आहे. त्यामुळेच आता राखीने तिच्या लग्नाची बाब मीडियासमोर उघड केली आहे. राखीने खुलासा केला की, गेल्या ७ महिन्यांपासून तिचे आदिलसोबत लग्न झाले आहे. आदिल आणि तिने कोर्ट मॅरेजही केले आहे.
[read_also content=”अहो आश्चर्यम! रस्त्यावर बाईक पार्क करणाऱ्याची हत्तीने चांगलीच जिरवली, धावत येत सोंडेनेच बाईक अशी उडवली की, व्हिडिओ होतोय व्हायरल https://www.navarashtra.com/viral/amazing-the-elephant-came-running-and-threw-the-bike-parking-middle-on-road-just-like-that-the-video-went-viral-nrvb-360981.html”]
लग्न लपवल्याच्या प्रकरणावर राखीने सांगितले की, आदिलने तिला याबद्दल कोणाला सांगण्यास नकार दिला होता, परंतु राखीला वाटते की, आदिलचे दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर आहे. राखीने तिच्या पतीवर आरोप केला आहे की, आदिलने तिच्याशी लग्न केले आणि नंतर तिचे नाव बदलून फातिमा ठेवले. राखी म्हणाली- मी खूप अस्वस्थ आहे. इथे माझ्या आईची प्रकृती बिघडत चालली आहे. काय करावे समजत नाही.
राखी सावंतची आई रुग्णालयात उपचार घेत आहे. राखीच्या आईला कॅन्सरसोबत ब्रेन ट्युमरही झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राखीला तिच्या आईच्या प्रकृतीची खूप काळजी वाटते. राखीला आता त्यांच्या नात्याबाबत लव्ह जिहादची चिंताही वाटत आहे.