(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
प्राण्यांच्या जीवनाविषयी बोलायचं म्हटलं की, शिकारीचा विषय समोर येतोच. एकाच्या जगण्यासाठी दुसऱ्याचा बळी जाणे हे वन्य जीवनातील एक कटू सत्य आहे. याचे दाखले आपल्याला अनेक व्हायरल व्हिडिओतून मिळत असतात. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही प्राण्यांच्या शिकारीचे असे अनेक व्हिडिओज पाहिले असतील. सध्या देखील अशाच एका शिकारीचा व्हिडिओ इथे वेगाने व्हायरल होत आहे मात्र यातील दृश्ये काहीसे कोड्यात टाकणारे आहेत. काय आहे यात ते जाणून घेऊयात.
शिकार म्हटलं की, मुख्यतः मोठे बलाढ्य प्राणी हे कमी ताकदीच्या प्राण्यांवर हल्ला करताना दिसून येतात. त्यांच्या शिकारीचा हा थरार अनेकदा आपल्या अंगावर काटा देखील आणतो. मात्र तुम्ही कधी शिकाऱ्याचीच शिकार होताना कधी पाहिले आहे का? नाही तर मग आता पाहा. मुळात बिबट्या हा जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्याच्या शिकारीच्या वेगाने अनेक प्राणी त्याला पाहून थरथर कापू लागतात पण नुकताच व्हायरल होत असलेला व्हिडिओ काही वेगळे दृश्ये दाखवतो. मोठमोठ्या प्राण्यांना मृत्यूच्या विळख्यात अडकवणारा हा बिबट्या इथे मात्र शिकार करताना स्वतःचा मृत्यूला बळी पडल्याचे दिसत आहे.
काय आहे व्हिडिओत?
तर व्हिडिओत तुम्हाला बर्फाळ पर्वतावरील काही दृश्ये दिसून येतील. यातच तुम्हाला काही मेंढ्या देखील दिसतील, मात्र तितक्यात मागून एक मेंढी वेगाने पाळताना दिसते. यावेळी ती फार घाबरलेली दिसते आणि तितक्यात तिच्या मागून बिबट्याची एंट्री होते. बिबट्या मेंढीला आपली शिकार बनवू पाहत असतो मात्र तितक्यात त्याचा तोल जातो आणि दरीत कोसळला जातो. व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, खोल दरीत कोसळतच बिबट्या जागीच मृत्युमुखी पावतो. याचा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत असून शिकारीचा हा थरार आणि बिबट्याचा क्षणार्धात झालेला नाश पाहून आता अनेकजण अचंबित झाले आहेत. मृत्यू कधी कोणाच्या जवळ येईल आणि आपलाच सापळा कधी आपल्यावर उलटा पडेल हे सांगता येत नाही हे यावरून आपल्याला कळते.
हा व्हायरल व्हिडिओ @khichdishorts नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘हिमालयात हिम बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर आपल्या मजेदार प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्लॅनिंग करून.. चिता दादा मारला गेलाय.. कोर्टात केस करू” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कधीही कोणत्याही गोष्टीच्या इतके मागे लागू नका की, ज्यामुळे तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.