(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर अनेकदा प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, मात्र आजकाल एका कुत्र्याचा व्हिडिओ सध्या फार व्हायरल होत आहे. यातील दृश्ये लोकांना विचार करायला भाग पाडत आहे. कुत्रा हा जमिनीवर चालणारा एक पाळीव प्राणी आहे अशात तुम्ही कधी कोणत्या कुत्र्याला अवकाशात उडताना पाहिले आहे का? याआधी हवेत उडणारा कुत्रा तुम्ही क्वचितच पाहिला असेल, पण या व्हिडिओमध्ये दिसणारा कुत्रा स्कायडायव्हिंग करताना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर पोस्ट होताच तो पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळली. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आता हा कुत्रा अवकाशात नक्की कसा उडाला त्याविषयी जरा सविस्तर जाणून घेऊया.
सोशल मीडियावर नेहमीच अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ अनेकांचे होश उडवत आहे. यात एक कुत्रा चक्क अवकाशात झेप घेताना दिसून आला आहे. व्हिडिओच्या सुरुवातीलाच जर तुम्ही पाहिले तर यात तुम्हाला निळ्याशार अवकाशातील काही दृश्ये दिसून येतील. यातच तुम्हाला एक काळ्या रंगाचा कुत्रा हवेच्या लहरींसोबत उडताना दिसून येईल. आता अनेकांना प्रश्न पडेल की, कुत्रा हवेत कसा काय उडू शकतो मात्र याचे उत्तर म्हणजे, खरंतर या कुत्र्याला पॅराशूट लावून हवेत उडवण्यात आले होते. यात कुत्र्याचे हावभाव पाहून तो आनंदी असल्याचे जाणवते. जणू अवकाशातील ही झेप त्याला दुसऱ्या जगाशी ओळख करून देत असो…
या व्हायरल व्हिडिओमध्ये एक कुत्रा आकाशात स्कायडायव्हिंग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ अगदी खरा वाटतो, मात्र ही क्लिप खरी नसली तरी ती AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या मदतीने तयार करण्यात आली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत करोडो व्ह्यूज आले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. अनेक लोक हा व्हिडिओ खरा मानत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @davidtrewern नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सोशल मीडियावर आतापर्यंत करोडो लोकांनी हा AI जनरेट केलेला व्हिडिओ पाहिला आहे. याशिवाय या व्हिडिओला इंस्टाग्रामवर 1,334,381 लोकांनी लाईक केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही युजर्सनी खूप मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओ पाहून एका युजरने लिहिले की, ‘वृद्ध लोक हे खरे मानतील’, तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘भाऊ, हे अगदी खरे दिसते.’
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.