सध्या उन्हाळा सुरु असून देशातील बहुतांश ठिकाणी यावेळी कडक उन्हाच्या धारा पाहायला मिळत आहेत. उन्हाचे तापमान हे दिवसेंदिवस तीव्र गतीने वाढतच चालले आहे. काही राज्यात तर हे तापमान तापमान 44 डिग्रीच्या पार गेले आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेकांना घरच्या बाहेर निघावेसे वाटत नाही. घराबाहेरच काय तर आता घरच्या आतही या दिवसांत उष्णतेची लहर पाहायला मिळते. भारतातील सर्वात उष्णतेचे आणि गर्मीचे ठिकाण म्हणजे राजस्थान. त्यातच आता राजस्थनमधील कडक उन्हातील भारतीय जवानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत जवान राजस्थानमधील तापलेल्या कडक वाळूत पापड भाजून दाखवताना दिसत आहे. यावरूनच आपण तेथील उष्णतेचा अंदाज लावू शकतो. इतक्या कडक उन्हात हे जवान तितक्याच निष्ठेने आपले काम बजावत असतात. व्हिडिओत दाखवण्यात आले आहे की, जवानाने वाळूत पापड ठेवला आणि अवघ्या काही मिनिटातच हा पापड भाजून निघाला. हा व्हिडिओ बिकानेरमधील असून, यावरून आपण तेथिल उष्णतेचा अंदाज लावू शकतो.
[read_also content=”डॉली चायवालानंतर आता पप्पू चायवाल्याचा व्हिडिओ वायरल, मिलियन्सने मिळाले व्ह्यूज https://www.navarashtra.com/viral/after-dolly-chaiwala-now-pappu-chawla-goes-viral-537699.html”]
इतक्या भीषण परिस्थितही जवान आपली जबाबदारी पार पडत असतात. अनेक नेटकऱ्यांनी, जवानांच्या कामाला सलाम केला आहे. सध्या राजस्थानच्या बिकानेरमध्ये ४७ सेल्सिअस इतके तापमान आहे. हा व्हिडीओ @Ayesha86627087 या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. यावर यूजरने म्हटले आहे की, भारतीय जवानांचे कौतुक करावे तितके कमी आहे, जवान खूप कठीण आणि संघर्षमय परिस्थितीत आपले कर्तव्य बजावत आहेत. अनेकांनी त्यांच्या या देशसेवेसाठी कडक सॅल्युट ठोकले आहेत.
त्यातच आता हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान हा व्हिडिओ पाकिस्थानजवळील बिकानेरच्या खादुवालामधील असल्याचे बोलले जात आहे. राजस्थानमधील बिकानेर हे शहर सर्वात उष्ण शहर म्हणून ओळखले जाते.