स्पा आहे की टॉर्चर? चीनमध्ये लोक मिरचीच्या पाण्यात मारतायत डुबक्या; VIDEO पाहून नेटकरी हैराण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रॅव्हल व्लॉगर जॉर्डन एग्बर्टने शेअर केलेला व्हिडिओ हा चीनच्या हेलोंगजियांग प्रांताची राजधानी हार्बिन येथील आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी स्तब्ध झाले आहेत. ट्रॅव्हल व्लॉगर जॉर्डन एग्बर्टने सांगितले आहे की, चीन लोक हॉट पॉट नावाच्या स्पाचा स्वच्छेने आनंद घेतात. Ice City म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हार्बिन शहरात एक मेपल लीफ व्हिलेज हॉट स्प्रिंग नावाचे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टने हॉट पॉट थीमवर एक अनोख पूल तयार केल्या आहेत. या पूलमध्ये लाल मिरच्या, जलापेनोने, गोजी बेरी, लाल खजरू आणि आणि काही भाज्या पाण्यात टाकण्यात आल्या आहेत.
जॉर्डन एग्बर्ट सांगितले की, येथील लोक या स्पाचा आंनद घेतता. यामुळे शरिराती रक्तभिसरण वाढते आणि शरीर उबदार राहते. तसेच यातील दुधाळ भाग लोकांच्या शरीराला मऊ करतो असे चीन लोकांचे मानने आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते यामुळे लोकांच्या त्वचेची तीव्र जळजळ होण्याची शक्यता आहे, एलर्जी होउन पुरळही येउ शकते.
वय तर फक्त एक आकडा! ९६ वर्षीय आजींचा भन्नाट डान्स; एनर्जी अशी की तरुणाईलाही लाजवेल, VIDEO VIRAL
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला आहे. चीन लोक स्वत:वर अत्याचार करत असल्याचे लोकांनी म्हटले आहे. एका नेटकऱ्याने भाऊ माणसे स्वत:ला शिजवत आहेत असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने या मिरच्यांच्या पाण्यापमुळे शरीरातील प्रायव्हेट पार्ट्सचे काय होईल असे आश्चर्यात्मक म्हटले आहे. या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






