वय तर फक्त एक आकडा! ९६ वर्षीय आजींचा भन्नाट डान्स; एनर्जी अशी की तरुणाईलाही लाजवेल, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईतील वृद्धांच्या एका कार्यक्रमात आजींनी भन्नाट असे नृत्य प्रदर्शन केले आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, आजींनी हिरव्यां रंगाची साडी घातली आहे. आजी पदर खोचून स्टेजवर भरतनाट्म सादर करत आहे. आजींनी सादर केलेल्या भरतानाट्यमच्या अवघड मुद्रा, अंगातील विलक्षण उर्जा पाहून तरुणाईही लाजेल. गुडघेदुखील, थकव्याचं वय असूनही आजींनी उत्कृष्ट हावभावांसह नृत्य सादर केले आहे. आजींचा हा थक्क करवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Viral News : हायड्रोजन फुगे ठरतायेत जीवघेणे! मध्य प्रदेशमध्ये भर सभेतील स्फोटचा Video Viral
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लटफॉर्म इन्स्टाग्रामवर @witripple या अकाउंटवर व्हायरल होत आहे. आजींचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. अनेकांनी भन्नाट अशा कमेंटही केल्या आहेत. एका नेटकऱ्याने आजींच्या काळात इन्स्टाग्राम असते तर त्यांनीही रिल बनवून व्हायरल झाल्या असत्या, तर दुसऱ्या एकाने, सुपर्ब आजी असे म्हटले आहे. आणखी एकाने आजींनी तरुणपणात अनेक पुरस्कार जिंकले असणार असे म्हटले आहे. काहींनी यावर हार्टचे इमोजी शेअर करत आजींचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
हट जा सामने से, मैं आया…! आंध्रप्रदेश या रस्त्यावर झाले वाघोबांचे दर्शन; पहा Viral Video
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






