नवी दिल्ली : आपल्या सर्वांना माहीत आहे की, सोशल मीडियावर (Social Media) वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येत असतात. यातील काही व्हिडिओ प्राण्यांशी संबंधित आहेत तर काही व्हिडिओ मजेदार गोष्टींशी संबंधित आहेत. आत्तापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर सापांशी (Snake) संबंधित अनेक व्हिडिओ (Video) पाहिले असतील, पण आज आम्ही ज्या व्हिडिओबद्दल सांगत आहोत, असा व्हिडिओ तुम्ही क्वचितच कुठेही पाहिला नसेल. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हा व्हिडिओ नाग नागीण जोडप्याचा आहे. नाग-नागिणीची जोडी (Nag-Nagin Dance Video Viral) सहसा एकत्र दिसत नाही तरी, माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की त्यांना एकत्र पाहणं हे अनेक लोक भाग्यवान मानतात. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच व्हायरल झाला आहे, असा व्हिडिओ तुम्ही पाहिलाही नसेल.
तुम्ही बघू शकता, हा व्हिडिओ चेन्नईचा आहे, जो काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया ट्विटरवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ ऐन उन्हाळ्यातला आहे. यावेळी प्रत्येक प्राणी आणि माणूस गारव्याच्या शोधात असतो, अशातच पाण्यात सापांची जोडी दिसली. हे दृश्य अत्यंत दुर्मिळ असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. @babs_dp या अकाउंटने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे, जो चेन्नईचा असल्याचा दावा करतो.
Who will get chance to see dis rare couple Romance Dance….. tat too in Chennai #SnakeRomance pic.twitter.com/ht6eVVUeo4
— Babs (@babs_dp) September 12, 2022