ओडिशा : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन जंगली अस्वल (Two Bears Entered Into A Village) ओडिशातील (Odisha) एका गावात शिरल्याचे पाहायला मिळत आहे. नंतर रहिवाशांनी त्यांचा पाठलाग केला. मीडिया (Media) रिपोर्ट्सनुसार, ही घटना नबरंगपूर (Nabrangpur) जिल्ह्यातील उमरकोट (Ummarkot) ब्लॉकमधील बुरजा गावातील आहे. एक अस्वल आणि त्यांचं पिल्लू अन्नाच्या शोधात गावात घुसलं. विशेष म्हणजे हे गाव जंगलाच्या हद्दीजवळ असल्यानं भूक लागल्यानं अस्वल गावात शिरल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओमध्ये कुत्रे अस्वलाचा पाठलाग करताना आणि भुंकताना दिसत आहेत, तर काही लोक मशाल घेऊन त्यांचा पाठलाग करत आहेत.
[read_also content=”लाईव्ह दरम्यान महिला रिपोर्टरला दिली कारने धडक, तरीही तिने सुरूच ठेवलं तिचं काम https://www.navarashtra.com/viral/omg-video-car-hit-woman-reporter-this-is-what-happened-then-viral-on-social-media-nrvb-226285.html”]
ओडिशातील नबरंगपूर जिल्ह्यातील उमरकोट ब्लॉकमधील एका गावात २ अस्वल फिरताना दिसले. बुर्जा गावातून येणारी ही बातमी धडकी भरवतेय. उमरकोट शहराच्या केंद्रापासून हे गाव फक्त ५ किलोमीटर अंतरावर आहे. गावात भरदिवसा दोन अस्वल मुक्तपणे फिरताना दिसले. सुदैवानं, अस्वल जवळच्या मुतुर्मा जंगलात परतले. अस्वल कोणतीही इजा न करता जंगलात परतल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. दोन जंगली अस्वल गावात घुसल्याचा आणि गावकऱ्यांमध्ये दहशत पसरवल्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.
Two wild bear ? entered into village, #Ummarkot, #Nabrangpur district. People were trying to drive out those wild bear.@DNabarangpur pic.twitter.com/cCSpX7FQRj
— Manas Behera @ANI (@manasbehera07) January 19, 2022
काही लोकांनी आपल्या गावात अस्वलाला पाहिल्यानंतर आरडाओरडा करून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान काहीजण हातात मशाल घेऊन ते अस्वलाच्या मागे धावले. तेव्हा तो परत जंगलात गेला. हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.