फोटो सौजन्य: व्हिडीओ स्क्रीनशॉट
जर तुम्ही बाहेरून कोणती खाण्या-पिण्याची गोष्ट खरेदी करत असाल तर काळजी घ्या. कारण उत्तरप्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध बिकानेर स्वीट्सच्या दुकानात समोस्यामध्ये असे काही आढळले आहे की सर्वत्र खळबळ उडाली आहे. बिकानेर स्वीट्सच्या समोस्याच्या आत बेडकाचा पाय सापडल्याचा आरोप एका ग्राहकाने केला आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस कारवाई सुरू केली आहे.
पोलिसांनी दुकानदाराला केली अटक
मिळालेल्या माहितीनुसार, एका ग्राहकाने दुकानातून खरेदी केलेले समोसे खाल्ले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला आणि त्यातून बेडकाच्या पायासारखे काहीतरी बाहेर आल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तात्काळ दुकानदाराला ताब्यात घेतले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी अन्न सुरक्षा विभागाला कळवले. अन्न सुरक्षा विभाग अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत समोसे आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने तापासणीसाठी घेतले.
नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून बेडकाचा पाय समोस्यामध्ये कसा आला हे तपासीनंतर स्पष्ट होईल अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बिकानेर स्वीट्स, जे गाझियाबादमधील प्रसिद्ध मिठाई आणि नमकीनचे दुकान आहे. या घटनेनंतर ते वादात सापडले आहे. दुकानदाराचे म्हणणे आहे की, तो कोणताही निष्काळजीपणा नाकारतो आणि तपासात सहकार्य करत आहे.
व्हिडीओ
गाजियाबाद, UP में समोसे के अंदर मेंढक की टांग निकली है। मामला बीकानेर स्वीट्स का है। पुलिस ने दुकानदार को कस्टडी में लिया। फूड विभाग ने सैंपल जांच को भेजे। pic.twitter.com/SBcsEs8nMr
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) September 12, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
या घटनेचा व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी थक्क झाले आहेत. अनेकजणांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एक युजरने म्हटले आहे की, बाहेर खाताना किंवा कोणतीही गोष्ट खरेदी करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तसेच आणखी एका युजरने म्हटले आहे की, व्हेजिटेरियन लोकांनी अशा दुकानातून खरेदी करू नये शक्यतो बाहेर काहीच खाऊ नये, हे सध्या सगळीकडेच घडत आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे. अशा घटनांमुळे लोकांचा आत्मविश्वास डळमळू शकतो आणि अन्न सुरक्षेबद्दल चिंता वाढू शकते. असेही एका युजरने म्हटले आहे. तसेच अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे.