संजय राऊतांचा भाजपवर निशाणा (फोटो- टीम नवराष्ट्र)
उपमुख्यमंत्री अजित पवार आनंतात विलीन
विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात पार पडला अंतिम विधी
खासदार संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
काल बारामती येथे विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यानंतर राज्यभरात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अजित पवार यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लाखो कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपने दिलेल्या जाहिरातीवर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांचे ट्वीट काय?
भाजपने कमाल केली! दादाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या! त्याने काय होणार?
भाजपने कमाल केली!
दादाना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या!
त्याने काय होणार? अजित दादांवर भाजपा म्हणजेचपं.मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ७० हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल
@Dev_Fadnavis
@narendramodi pic.twitter.com/bk1a61mVcd — Sanjay Raut (@rautsanjay61) January 29, 2026
अजित दादांवर भाजपा म्हणजेचपं.मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ७० हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल.
पुणे पोलिसांकडून ‘एडीआर’ दाखल
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरूवारी (29 जानेवारी) अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले. काल (२८ जानेवारी) सकाळी ८.४५ च्या सुमारास बारामतीतील सभेसाठी अजित पवार आले होते. पण रनवेवर उतरताना अचानक त्यांचे विमान कोसळले. या दुर्घटनेमुळे राज्यात शोककळा पसरली आहे. पण रनवेवर उतरताना अचानक त्यांचे विमान कोसळले. या दुर्घटनेमुळे राज्यात शोककळा पसरली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी अपघातासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी २८ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील बारामतीत झालेल्या विमान अपघातासंदर्भात अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवला आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्यात एडीआर नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या सर्व पैलूंचा तपास केला जात असून हा एडीआर महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपवण्यात येईल,. त्यानंतर विमान अपघात अन्वेषण ब्युरो (एएआयबी) च्या निष्कर्षांवर आधारित स्वतःचा तपास करेल. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अपघातग्रस्त विमान हे व्हीटी-एसएसके नोंदणी क्रमांक असलेले लिअरजेट ४५ होते. हे विमान व्हीएसआर व्हेंचर्स चालवत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एक वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (पीएसओ), एक विमान परिचारिका आणि दोन क्रू सदस्य – पायलट-इन-कमांड (पीआयसी) आणि सेकंड-इन-कमांड (एसआयसी) होते.






