फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा मनोरंजक तर कधी चित्र-विचित्र व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डान्स रिल्स, जुगाड, स्टंट तर कधी भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. तसेच तुम्ही दिल्ली मेट्रोचे देखील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. कोणी मेट्रोत चित्र-विचित्र रिल बनवताना तर कोणी पत्ते खेळताना. तसेच भांडणांचे देखील अनेक व्हिडिओ दिल्ली मेट्रोचे व्हायरल होत असतात.
यामध्ये तरुण-तरुणींच्या भांडणांचे व्हिडिओ व्हायरल होतक असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, यामध्ये एक तरुण आणि वयस्कर व्यक्तींमध्ये भांडणे सुरु आहेत. सध्या हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोचर्चेत आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जाणून घेऊयात नेमके काय घडले?
नेमके काय घडले?
व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, दोन प्रवासी एकमेकांसोबत भांडण करत आहेत. यामध्ये एक तरुण मुलगा आहे तर एक वयस्कर व्यक्ती आहे. काही वेळ शाब्दीक वाद झाल्यानंतर त्यांच्या हाणामारी सुरू होते. मात्र त्यांच्या हाणामारीचे कारण स्पष्ट कळालेले नाही. दोघेही एकमेकांना जबरदस्त मारत आहे. एक तरुण त्यांच्यातील बाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ना तरुण ऐकत आहे ना वृद्ध व्यक्ती या दृश्याचा व्हिडिओ मेट्रोतीलच एका प्रवाशाने कॅमेरात कैद केला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Kalesh b/w Two Uncle’s inside Delhi Metro
pic.twitter.com/bPf7ue1WTA— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 30, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @gharkekalesh अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाको लोकांनी पाहिले असून लाईक देखील केले आहे. अनेकांनी या व्हिडिओचा आनंद लुटला आहे. एका युजरने म्हटले आहेकी, हे रोज पाहायाला मिळते. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ काय हे मोठ्यांचा देखील आदर नाही. आणखी एका युजरने म्हटले आहे की, करा अजून हाणामारी, मी पॉपकॉर्न घेऊन बसतो. तसेच या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, दोन प्रवाशांमध्ये हाणामारी. याशिवाय या व्हिडिओवर हसण्याचे इमोजी देखील शेअर करण्यात आले आहेत.
व्हायरल व्हिडिओ वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.