बिहारीचा अमेरिकेत जलवा! सोन्याच्या भावात विकतोय चहा अन् पोहे , किंमत जाणून तुम्हीही व्हाल दंग, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तर चहाची किंमत ही सुमारे ७८२ रुपये आहे, तर पोह्याची किंम ही १५१२ आहे. ही किंमत जाणून अनेकांना धक्का बसला आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, लॉस एजंलिसच्या रस्त्यावर बिहारी व्यक्ती एका गाडीतून चहा आणि पोहे विकताना दिसत आहे. तसेच ग्राहकांशी आत्मविश्वासाने संवाद साधत आहे. कठोर परिश्रम करुन तो आपले काम प्रामाणिकपण करत आहे. त्याच्या मते कोणतेही काम छोटे नसते. चहा आणि पोह्याची किंमत ही तेथील खर्चानुसार, योग्य आहे. परंतु यामुळे त्याच्यावर काहींनी टीका करत तो गोऱ्यांना लुटत असल्याचे म्हटले आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शन्समध्ये धुमाकूळ उडाला आहे.
प्रेम कधीही म्हतारं होत नाही! आजोबांनी आजीच्या वाढदिवसाला दिलं खास सरप्राइज; VIDEO पाहून नेटकरी फिदा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @oc_.alpha.sp या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी तरुणाला टोपीबाज म्हटले आहे. तर काहींनी त्याला साथ दिली आहे. एका नेटकऱ्याने भाऊ जलवा आहे तुझा असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने आधी गोऱ्यांनी आपल्याला लुटला आता त्यांना लुटायचे असे म्हटले आहे. तर चहाची किंमत जाणून अनेकांना धक्का बसला आहे. परंतु अमेरिकेतील खर्चानुसार, डडलरनुसार ही किंमत कमी असल्याचे लोकांचे मत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
धावत्या ट्रेनसमोर रिल बनवण्याची खुमखुमी; तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून अंगावर येईल काटा, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






