फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच, डान्स, जुगाड, स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. अलीकडे लोकांचे स्टंट करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेषत: तरुण लोक धोकादायक स्टंट करतात. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोणी कधी कोणता स्टंट करेल सांगता येत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये कपल्स ला स्टंट करणे महागांत पडले आहे. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. जाणून घेऊयात नेमके काय घडले?
नेमके काय घडले?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक पुल दिसत आहे. पुलाच्या खालून कॅनलचे पाणी वाहत आहे. कॅनलवर एक अरुंद असा खांब आहे. तिक्यात एक मुलगा आणि मुलगी तेथे येतात. ते त्या अरुंद खांबावर चालत येऊन एकमेकांनी मिठी मारतात. त्यानंतर त्यावर खाली बसतात. एतक्यात आणखी एक तरुण तिथे येतो आणि बसलेल्या तरुणाला बाहत्या पाण्यात ढकलून देतो. हा सर्व व्हिडिओ रिल्स साठी बनवत असल्याचे कळाल्याने तिथे जमा झालेली माणसे संतापतात. मात्र, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चाचा विषय बनला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
हरिद्वार गंगा और रुड़की गंगनहर पर अश्लील कंटेंट और खतरनाक स्टंट के साथ Reel बनाने वाले 3 लड़के और 2 लड़कियां पकड़े गए। रुड़की पुलिस ने FIR दर्ज की। पुलिस ने बताया– अश्लीलता फैलाकर इन रील पुत्र–पुत्रियों ने सोशल मीडिया पर 528K फॉलोअर बना लिए।@AnujTyagi8171 pic.twitter.com/2JiMynGe26
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) December 16, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर SachinGuptaUp शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी संतापजनक प्रतिक्रीया दिल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. एका युजरने म्हटले आहे की, पाण्यात डुबण्याची प्रयत्न थोडा कॅज्युअल होता. तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, तसाच वाहत गेला असता तर समजले असते त्याला. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, अशा व्हिडिओतून लक्षात घेण्यासारखे आहे की, असे स्टंट आपल्या जीवावर देखील बेतू शकतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.