हा तर रिटायर कबीर सिंग! आजीसोबत आजोबांची स्वॅगमध्ये बुलेट राईड; VIDEO नेटकऱ्यांच्या पसंतीस (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्रेमी जोडप्यांचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. एकदा एखाद्याच्या प्रेमात पडला तर त्या व्यक्तीला सर्वकाही मानतो. परंतु केवळ प्रेम असून चालत नाही. तर प्रेम व्यक्तही करता यायला हवे. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिलेही असतील. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओवरुन प्रेमाला वायचं बंधन नसते हे स्पष्ट होताना दिसत आहे. यामध्ये एक आजोबा आजींसोबत बाईकवर फिरताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वृद्ध काका त्यांच्या बायकोयोबत बाईकवरुन फिरायला चालले आहेत. विशेष म्हणजे दोघेही बुलेटवर बसून उत्साहाने फिरत आहेत. आजोबा एका वेगळ्याच स्वॅगमध्ये बुलेट चालवत आहेत. तुम्ही पाहू शकता की, एका महामार्गावर आजोबा आजींसोबत बुलेट राइडचा अनुभव घेत आहेत. हे दृश्य एखाद्या चित्रपटासारखे वाटत आहे. आजी देखील एकदम स्टाईलमध्ये आजोबांच्या खाद्यांवर हात ठेवून बसल्या आहेत. हा व्हिडिओ तिथूनच जाणाऱ्या एका कारचालकाने रेकॉर्ड केला आहे. सध्या हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @the_green_bonneville या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरेन म्हतारा कबीर सिंग असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने काकांचा स्वॅगच भारीये असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने कबीर सिंग रिटायर झाल्यावर असे म्हटले आहे. याच वेळी बुलेटवर टायटॅनिक लिहिलेले दिसत आहे. यावर तरुणाने एक प्रतिक्रिया दिली आहे. दोघे जॅक आणि रोझ आहेत असे म्हटले आहे. अनेकांनी हार्टचे इमोजी देखील शेअर कले आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.