"तेरे से शादी करने को मैं मुंबई से गोवा आया" गाण्यावर काकांचा थेट विमानात डान्स; VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. रोज काहीतरी नवीन ट्रेंड्स सुरू होतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक दिवसाच्या प्रत्येक क्षणाला रील्स तयार करत आहेत. अलीकडच्या काळात लोकांना रील बनवण्याचे, स्टंटबाजीचे असे वेड लागले आहे की, लोक कुठेही कधीही सुरु होतात. लोकांना कशाचेच भान राहिलेले नाही. बस, ट्रेन, मंदिरं, बाजार एवढंच काय तर स्मशानात सुद्धा लोक रील बनवत होते पण आता लोकांनी थेट विमानामध्ये देखील रील बनवण्यास सुरुवात केली आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी या रिल बनवणाऱ्याची खिल्ली उडवली आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील हसल्याशिवाय राहणार नाही.
नेमकं घडलं काय?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की,एक व्यक्ती बॉलिवूड चित्रपट “जान तेरे नाम”मधील गाण्यावर डान्स करत आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती विमानामध्ये डान्स करत आहे. हा डान्स पाहून अनेकांनी काकांची खिल्ली उडवली आहे. मात्र भारी एक्सप्रेशन देत या काकांनी भन्नाट असा डान्स केला आहे. “तेरे से शादी करने को मैं मुंबई से गोवा आया” असे आहेत. हा व्यक्ती खूपच मजेत डान्स करत असला तरी, व्हिडीओमध्ये पाठीमागे असलेल्या प्रवाशांचे एक्सप्रेशन्स पाहून आपल्याला खूप हसू येईल. ते लोक त्याच्या डान्सवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत, आणि त्यांचे चेहेरे पाहून लक्षात येतं की त्यांना हा दृश्य खूपच विचित्र आणि नवा वाटत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Pura introvert समाज dara hua hai 😅 pic.twitter.com/E6X9DgO1KW
— Rattan Dhillon (@ShivrattanDhil1) January 24, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ShivrattanDhil1 या अकाऊंटवर शएअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. या व्हिडिओला 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओ मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणतंय की, अशा लोकांना विमान प्रवासावर बंदी घालायला हवी, तर काही लोक म्हणतात की, ‘एमरजन्सी एक्झिट’चा खरा अर्थ आजच त्यांनी समजला. हा व्हिडिओ सध्या कोणत्या फ्लाईटमधील आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.