रिल बनवण्याच्या नादात जीवाला मुकला; उंचावरुन नदीत उडी मारली अन्...; तरुणाच्या मृत्यूचा Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी स्टंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसेंदिवस तरुणी मंडळी सोशल मीडियाच्या आहारी जाऊन आपला जीव धोक्यात घालत आहे. स्टंटमुळे आतापर्यंत अनेकजण जीवाला मुकले आहेत. सध्या असाच एक धक्कादाक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यामध्ये एका तरुणाने रील बनवण्याच्या नादात आपला जीव गमवला आहे.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, नदीचा परिसर दिसत आहे. तसेच नदीचे पाणी झऱ्यातून खाली पडत आहे. तिथेच एक मुलगा झऱ्याच्या टोकावर उभा असून रिल बनवत आहे. यासाठी तो उंचावरुन नदीत उडी मारतो. मात्र, उडी मारल्यावर असे काही घडते की, ज्याचा त्याने विचारही केला नसेल. जास्त उंचीवरुन चुकीच्या पद्धतीने उडी मारल्याने तरुणाचा जीव जातो. तो उंचावरुन उडी मारल्याने धापकन पाण्यात पडतो. तो छातीवर पाण्यात पडल्याने त्याला झटका बसतो. त्याने उडी मारल्यावर बऱ्याच वेळ तो वर न आल्याने त्याचे मित्र त्याला आवाज देतात मात्र तो वर येत नाही. तसेच इचक कोणीही त्याला वाचवण्यासाठी जात नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
View this post on Instagram
A post shared by Attitude Marathi Dialogue (@attitude_marathi_dialogue_007)
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @attitude_marathi_dialogue_007 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये व्हिडीओ बनवण्याच्या नादात गेला जीव, जास्त वरून उडी मारल्यामुळे छातीला धपका बसला असे लिहिले आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे आणि कधीचा आहे, तसेच त्या मुलाचा जीव नक्की गेला का किंवा तो कुठे गेला याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही. हा व्हिडिओपाहून अनेकांनी त्याने चुकीच्या पद्धतीने उडी मारली असल्याचे म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, हा स्टंट प्रकार आहे त्याला काहीही झाले नसणार, तर अनेकांनी या तरुणाची खिल्ली उडवली आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी असे स्टंट न करण्याचा सल्ला दिला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.