(फोटो सौजन्य: X)
किंग कोब्रा हा जंगलातील धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्याची दहशत संपूर्ण जंगलात इतकी आहे की त्याला पाहून जंगलाचा राजा पण उलटे पाय घेऊन पळत सुटतो. कोब्राच्या विषाने संपूर्ण जंगल हादरत असतानाच सोशल मीडियावर सर्वांनाच अचंबित करणारा एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका चिमुकल्या मुलाने कोब्राला अक्षरशः खेळण्याप्रमाणे खेळवताना दिसून आले आहे. कोब्रा ज्याला पाहून आपण त्याच्या जावळही जाणार नाही पण अशाच प्राण्याची जराही गय न करता चिमुकला धैर्याने त्याला मुठीत पकडतो आणि खळखळून हसू लागतो. हे दृश्य सर्वांनाच थक्क करत असून चिमुकल्याच्या या प्रतापाने आता संपूर्ण इंटरनेट घाबरून गेलं आहे.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक लहान मुलगा कोब्राला अजिबात न घाबरता त्याचा जबडा आपल्या मुठीत पकडतो. मुख्य म्हणजे कोब्रा इकडून तिकडून वळवळत असतो पण मुलगा अजिबात घाबरत नाही आणि कोब्राला असे तडफडताना पाहून तो मिश्किलरित्या हसू लागतो. एवढ्या लहान मुलाला इतक्या सहजपणे सापाला कसे हाताळता येते हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओमध्ये, तो मुलगा काठीच्या मदतीने सापाला नियंत्रित करतो आणि नंतर तो आपल्या मुठीत धरतो. युजर्स मात्र त्याच्या या पराक्रमावर आता निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काहीजण मुलाच्या धाडसाचे कौतुक करत आहेत तर काही मुलाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. दरम्यान हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे अद्याप समोर आलेलं नाही पण व्हिडिओतील दृश्यांनी लोकांना घाबरवून सोडले आहे.
छोटू का यमराज के साथ उठना बैठना लगता है
लेकिन यह साहस जानलेवा भी साबित हो सकता हैं😱 pic.twitter.com/nAuVU7DcaQ
— Manju (@cop_manjumeena) August 20, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @cop_manjumeena नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा विषरी साप नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो एक लहान मुलगा आणि निष्पाप आहे, तुम्ही अगदी बरोबर लिहिले आहे, जर त्याने थोडीशी चूक केली तर तो जीवनाचा प्रश्न आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे बापरे, हे खूप धोकादायक आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.