Johannesburg Shooting : दक्षिण आफ्रिका हादरलं! जोहान्सबर्गमध्ये भीषण गोळीबार ; लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दक्षिण आफ्रिकेची मोठी कारवाई! बनावट व्हिसावर आलेल्या बांगलादेशी नागरिकांना अटक, मानवी तस्करीचा इशारा
जोहान्सबर्गच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून हेले आहेत. तसेच या हल्ल्यामागचा हेतूही अस्पष्ट आहे. अचानक काही हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने जोहान्सबर्गच्या पश्चिम भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. सध्या हल्लेखोरांबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
हल्ल्यात लहान मुलांसह ११ जण ठार
या हल्ल्यात ३ लहान चिमुकल्यांसह ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११ जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जोहान्सबर्ग येथे मोठ्या सोन्याच्या खाणीजवळ गोळीबाराची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रत्यक्षदर्शनींची चौकशी केली जात आहे. घटनास्थळी नेमकं काय घडले? हल्लेखोर कोण होते? त्यांचा हेतू काय होता? हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय प्रांतीय गुन्हे दृश्य व्यवस्थापन पथक देखील यासाठी आले आहे. तसेच स्थानिक गुन्हेगारी केंद्र, गंभीर गुन्हे अन्वेषण पथक, गुन्हे गुप्तचरचे देखील एक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. यापूर्वी 6 डिसेंबर रोजी देखील दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरियाजवळ घडली होती. एका वस्तीगृहावर गोळीबारा करण्यात आला होता. यामध्ये तीन वर्षाच्या चिमुकल्यासह १२ जण मृत्यूमुखी पडले होते.
गेल्या काही काळात दक्षिण आफ्रिकेच गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. २०२५ मध्ये एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान पोलिसांनी बेकयायदेशीर दारुविरोधात कारवाई केली होती. याअंतर्त १२ हजार ठिकाणे बंद करण्यात आली होती. तर १८ हजाराहून अधिकांना अटक झाली होती. संयुक्त राष्ट्राच्या ड्रग्ज आणि गुन्हेगारी कार्यालयाच्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेत गेल्या दोन वर्षात १००,००० लोकांमागे ४५ लोकांचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेत मोठी दुर्घटना! हिंदू मंदिर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू
Ans: दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे मोठ्या सोन्याच्या खाणीजवळ गोळीबार घडला आहे.
Ans: दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथे झालेल्या ताज्या गोळीबाराच्या घटनेत ३ लहान मुलांसह ११ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जखमी झाले आहेत.






