इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासच्या दहशतवाद्यांमध्ये शनिवारपासून जोरदार युद्ध (Israel Hamas war) सुरू आहे. या युद्धातील मृतांची संख्या 1100 च्या वर गेली आहे. मृतांमध्ये अमेरिका आणि फ्रान्सच्या नागरिकांचाही समावेश आहे. शनिवारी हमासने इस्रायलवर एका पाठोपाठ पाच हजार रॉकेट डागले. तसेच मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांनी घुसखोरी करून लोकांना ओलीस ठेवले. यानंतर इस्रायलने युद्धाची घोषणा केली आहे. इस्रायली हवाई दल बॉम्बफेक करून गाझा पट्टीतील हमासची जागा उद्ध्वस्त करत आहे. त्याचवेळी इस्रायली सैनिक दहशतवाद्यांशी आमनेसामने लढत आहेत.
[read_also content=”शिवसेना फुटीची आणि राष्ट्रवादीच्या याचिकेवर एकत्र सुनावणी होणार, सर्वोच्च न्यायलयाने विधानसभा अध्यक्षांना लवकरात लवकर उत्तर देण्याचे दिले आदेश https://www.navarashtra.com/state/shivsena-nationalist-congress-eknath-shinde-sharad-pawar-uddhav-thackeray-president-rahul-narvekar-supreme-court-maharashtra-government-467537.html”]
गेल्या काही दिवसांपासून इस्रायलच्या भूमीवर हमासच्या दहशतवाद्यांकडून कारवाया सुरु असल्याचे दावे केले जात होते. हे दहशतवादी मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याचंही बोललं जात होतं. शनिवारी सकाळी इस्रायलच्या भूमीवर गाझा पट्ट्यातून किमान डझनभर रॉकेट लाँच करण्यात आले. त्यापाठोपाठ मोठ्या प्रमाणावर गाझा पट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्यानंतर इस्रायलनं युद्धाची घोषणा केली.
हमासच्या दहशतवाद्यांनी आतापर्यंत अनेक नागरिकांचे अपहरण करून त्यांची हत्या केली आहे. या हल्ल्यात 700 इस्रायली लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सैनिकांचाही समावेश आहे. तर, 1900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. गाझा पट्टीमध्ये 413 लोकांचा मृत्यू झाला असून 2300 लोक जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात तीन अमेरिकन नागरिकांसह एका फ्रेंच नागरिकाचीही हमासच्या दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यासोबतच 10 नेपाळी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकन सरकारने रविवारी सांगितले की ते इस्रायली संरक्षण दलांना मदत करण्यासाठी शस्त्रांसह अतिरिक्त उपकरणे आणि पुरवठा पाठवेल. राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना अधिक मदत मार्गावर असल्याचे आश्वासन दिले.