File Photo : firing
वॉशिंग्टन : अमेरिकेत गोळीबाराचं (America Hospital Shooting) सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. आताही एक गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. अमेरिकेच्या ईशान्येकडील न्यू हॅम्पशायर राज्यातील मनोरुग्णालयात शुक्रवारी (America Hospital Shooting) एका व्यक्तीने गोळीबार केल्याने एकाचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी त्याला ठार केले. राज्य पोलीस कर्नल मार्क हॉल यांनी सांगितले की संशयिताने कॉन्कॉर्डमधील न्यू हॅम्पशायर रुग्णालयात प्रवेश केला आणि लॉबीमध्ये एका व्यक्तीवर गोळी झाडली.
[read_also content=”आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटाच्या तीन नेत्यांविरोधात गुन्हा दाखल, परवानगीशिवाय उड्डाणपुलाचं केलं उद्घाटन! https://www.navarashtra.com/maharashtra/case-registered-against-aditya-thackeray-in-acse-of-illegalityoepning-of-481560.html”]
“रुग्णालयात नियुक्त केलेल्या सुरक्षा रक्षकाने तत्काळ कारवाई केली आणि गोळीबार केला आणि या गोळीबारात संशयिताचा मृत्यू झाला. हा हल्ला रुग्णालयाच्या लॉबीपुरता मर्यादित असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांनी शूटर किंवा पीडित व्यक्तीची ओळख पटवली नाही. “जनतेला कोणताही धोका नाही आणि रूग्ण किंवा रूग्णालयातील कर्मचार्यांना कोणताही धोका नाही,” ते म्हणाले.
हॅम्पशायरमधील 185 बेडचे हॉस्पिटल असल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर मानसिक आजार असलेल्या रुग्णांवर येथे उपचार केले जातात. अशा परिस्थितीत गोळीबार करणाऱ्याचा हेतू काय होता हे समजण्यापलीकडचे आहे. अखेर गोळीबार करण्यासाठी ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये का घुसली? असा सवाल आता विचारला जात आहे.
अमेरिकेत नेहमी घडणाऱ्या गोळीबाराच्या घटना चिंताजनक आहेत. अमेरिका असा देश आहे की जिथे माणसांपेक्षा बंदुका जास्त आहेत. बंदुकांच्या विक्रीबाबत कडक नियम बनवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण प्रत्येक वेळी विरोध झाला. अनेक निवडणुकांमध्ये शस्त्र बंदीचा मुद्दाही उपस्थित झाला आहे.