श्रीलंकेत ट्रेनला धडकून 6 हत्तींचा मृत्यू; 2 जखमींवर उपचार सुरु (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कोलंबो: श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये गुरुवारी (20 फेब्रुवारी) सकाळी एक दुर्घटना घडली. एका हत्तींच्या कळपाला धडकल्यानंतर एक ट्रेन रुळावरुन घसरली. या घटनेत सहा हत्तींचा मृत्यू झाला असून ही घटना कोलंबोपासून 180 किमी अंतरावर असलेल्या हबरानाच्या वन्यजीव अभयारण्याजवळील रेल्वे रुळापाशी घडली. तथापि, या अपघातात को कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाली नाही. सध्या दोन हत्तींवर उपचार सुरु आहे.
पोलिस अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, हत्तींच्या कळपाची ट्रेनशी टक्कर होणे काही नवीन घटना नाही. यापूर्वी देखील अशा अनेक घटना श्रीलंकेत घडल्या आहेत.
Tragedy 😢🐘🚊🐘
The Batticaloa-Colombo train, ‘Meenagaya’, has collided with a herd of elephants at Gal Oya, resulting in the tragic death of 5 elephants.The collision has caused the train to derail, obstructing services on the line, the Sri Lanka Railways says. pic.twitter.com/3lL7AKJzJE
— Sri Lanka Tweet 🇱🇰 (@SriLankaTweet) February 20, 2025
घटना कशी घडली?
पोलिसांनी सांगितले की, हत्तींचा कळप रेल्वे मार्ग ओलांडत असताना हा अपघात घडला. रेल्वेच्या धडकेमुळे काही डब्बे रुळावरुन घसरले, मात्र, कोणताही जीवितहानी झाली नाही. सध्या अपघातात जखमी झालेल्या दोन हत्तींच्या उपचारासाठी वन्यजीव अधिकाऱ्यांनी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. अपघातानंतर एक हत्ती जखमी पिलाच्या बाजूला उभा राहून त्याला आधार देत असल्याचे भावनिक दृश्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत
श्रीलंकेत अशा घटना घडणे ही काही पहिलीच वेळी नाही. यापूर्वी सप्टेंबर 2018 मध्येही याच भागात एका गरोदर हत्तीणीसह दोन पिलांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. यामुळे, सरकारने रेल्वे चालकांना हत्तींच्या संचाराच्या भागात गतीमर्यादा पाळण्याचे आदेश दिले होते.
पूर्वीच्या घटना
2023 मध्ये देखील मानव-हत्ती संघर्षात 150 लोक णि 450 हत्ती मृत्यूमुखी पडले होते. याशिवाय, 2024 मध्ये 170 हून अधिक लोक तर, सुमारे 500 हत्ती मारले गेले. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, दरवर्षी सुमारे 20 हत्ती रेल्वेच्या धडकेत मृत्युमुखी पडतात.
पर्यावरण मंत्र्यांची प्रतिक्रिया
या समस्येवर उपाय म्हणून पर्यावरण उपमंत्री अंतोन जयकोडी यांनी सांगितले की, सरकार अनेक उपाययोजना राबवणार आहे. गावांमध्ये हत्ती घुसू नयेत म्हणून इलेक्ट्रिक कुंपण, चर आणि इतर अडथळे उभारले जातील. त्यामुळे हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी होण्याची आशा आहे.