(Colombia Helicopter Crash) कोलंबिया मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कोलंबियामध्ये लष्कराचं सामान वाहून नेणाऱ्या एका लष्करी हेलिकॉप्टर मोठा अपघात झाला. कोलंबियातील उत्तरेकडील भागात हे हेलिकॅाप्टटर कोसळून नऊ सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
[read_also content=”मोठी बातमी! AstraZeneca कंपनीनं मान्य केलं की, लोकांमध्ये कोवीशिल्ड लसीचे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात https://www.navarashtra.com/india/astrazeneca-admits-that-covishield-can-cause-rare-side-effect-like-blood-clotting-nrps-528471.html”]
रिपोर्ट नुसार, रशियन बनावटीच्या या एमआय-17 हेलिकॉप्टरनं उड्डाण घेताच काही वेळात अपघातग्रस्त झालं. या अपघाताचं नेमकं कारण समोर आलं नाही.
कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी सोमवारी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “लष्करी हेलिकॉप्टरमधील नऊ सैनिकांच्या मृत्यूबद्दल मी दुख व्यक्त करतो. “त्यांनी आखाती घराण्याविरुद्ध कारवाई करणाऱ्या सैनिकांना मौल्यवान साहित्य पुरवले असते.” मात्र हे हेलिकॉप्टर स्थानिक वेळेनुसार 12:00 वाजता कोसळले, असे लष्कराने सांगितले.