कबरींच्या भूमी असलेल्या इजिप्तमध्ये ४,५०० वर्ष जुने सूर्यमंदिर सापडले. काय आहे त्यामागील लपलेला संदेश? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Ancient Egypt Sun Temple Discovery 2025 : इजिप्त (Egypt) म्हटलं की डोळ्यांसमोर येतात ते अजस्त्र पिरामिड्स, ममी आणि गूढ थडगी. मृत्यूचा उत्सव साजरा करणारा देश अशी इजिप्तची ओळख आहे. मात्र, पुरातत्वशास्त्रज्ञांनी लावलेल्या एका ताज्या शोधाने या ओळखीला एक नवीन वळण दिले आहे. कैरो शहराच्या जवळ उत्खननादरम्यान ४,५०० वर्षांपूर्वीचे एक अतिशय भव्य ‘सूर्य मंदिर’ सापडले आहे. हे मंदिर प्राचीन इजिप्शियन संस्कृतीचे विज्ञानाशी असलेले नाते उलगडणारे ठरले आहे.
हे मंदिर कैरोच्या दक्षिणेस सुमारे ९ मैलांवर आणि पवित्र नाईल नदीच्या पश्चिमेस ५ मैल अंतरावर असलेल्या एका वाळवंटी भागात सापडले. संशोधकांच्या मते, हे मंदिर इजिप्तच्या पाचव्या राजवंशातील राजा (फारो) न्युसेरे इनी याने बांधले होते. या राजाने साधारणपणे २४२० ते २३८९ ईसापूर्व या काळात इजिप्तवर राज्य केले होते. पाचवा राजवंश हा इजिप्तमधील सूर्यपूजेचा सुवर्णकाळ मानला जातो आणि हे मंदिर त्याचे जिवंत उदाहरण आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi Snow : जगाचा अंत जवळ आलाय? सौदी अरेबियातील बर्फवृष्टीमुळे कालचक्र फिरलं अन् पैगंबरांची ‘ती’ भविष्यवाणी पुन्हा जिवंत
प्राचीन इजिप्तमध्ये सूर्य देव ‘रा’ (Ra) यांना विश्वाचा निर्माता मानले जात असे. या मंदिरात सापडलेल्या पुराव्यांवरून असे दिसून येते की, त्या काळातील राजे स्वतःला ‘रा’ देवाचे पृथ्वीवरील प्रतिनिधी मानत असत. आपली राजेशाही सत्ता वैध ठरवण्यासाठी ते सूर्याची आराधना करत. हे मंदिर केवळ धर्माचे केंद्र नव्हते, तर राजाची ताकद आणि दैवी शक्ती यांचा संगम होता.
🚨4,400-Year-Old Sun Temple of King Nyuserre Uncovered at Abusir Necropolis in Egypthttps://t.co/CJMuksI7fk#archaeology #temple #architecture #ancientEgypt #OldKingdom pic.twitter.com/9UwFwvCdln — Madam Archaeologist (@madamarchaeo) December 18, 2025
credit : social media and Twitter
या उत्खननातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, मंदिराच्या छताची रचना. संशोधकांच्या मते, या मंदिराच्या छताचा वापर त्या काळातील पंडित आणि शास्त्रज्ञ तारे, ग्रह आणि नक्षत्रांचा अभ्यास करण्यासाठी करत असत. मंदिरात दगडावर कोरलेली एक ‘धार्मिक दिनदर्शिका’ देखील सापडली आहे. यामध्ये सण, उत्सव आणि खगोलीय घटनांची नोंद आहे. यावरून हे स्पष्ट होते की, ४,५०० वर्षांपूर्वीचे इजिप्शियन लोक खगोलशास्त्रात (Astronomy) किती प्रगत होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Sharif Osman Hadi: एक गोळी डोक्यात लागली आणि ‘तो’ रक्ताच्या थारोळ्यात; उस्मान हादीच्या हत्येमुळे बांगलादेश हिंसाचाराने पेटला
सुमारे १०,००० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले हे मंदिर पांढऱ्या चुनखडीच्या दगडातून साकारले गेले होते. यामध्ये ग्रॅनाइटचे खांब, लांबलचक कॉरिडॉर आणि छताकडे जाणाऱ्या भव्य पायऱ्या आहेत. विशेष म्हणजे, मंदिरात ‘सेनेट’ नावाच्या प्राचीन खेळाचे लाकडी तुकडेही सापडले आहेत. याचा अर्थ असा की, येथे केवळ पूजाच होत नव्हती, तर लोक सामाजिक रित्या एकत्र येऊन मनोरंजनाचे खेळही खेळत असत. या मंदिराला नाईल नदीशी जोडणारा एक विशेष मार्ग (Ramp) देखील सापडला आहे. यावरून असे समजते की, त्या काळी यात्रेकरू बोटीने या मंदिरात दर्शनासाठी येत असावेत. काळानुरूप या मंदिराचे धार्मिक महत्त्व कमी झाले आणि त्याचे रूपांतर निवासी वस्तीत झाल्याचेही काही खुणा सांगतात. इजिप्तचा हा नवा शोध हे सिद्ध करतो की, प्राचीन मानव केवळ मृत्यूच्या भीतीखाली जगत नव्हता, तर तो सूर्यासारख्या ऊर्जेच्या स्रोताचा अभ्यास करत होता आणि विज्ञानाच्या जोरावर जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.
Ans: हे सूर्य मंदिर सुमारे ४,५०० वर्षे जुने असून ते पाचव्या राजवंशातील फारो न्युसेरे इनी याच्या काळातील आहे.
Ans: हे मंदिर प्राचीन इजिप्शियन सूर्य देव 'रा' (Ra) यांना समर्पित आहे, ज्यांना विश्वाचा निर्माता मानले जात असे.
Ans: हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नव्हते, तर ते खगोलशास्त्राचे केंद्र होते. येथे तारे आणि ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी विशेष व्यवस्था होती.






