शरीरामध्ये डुकराची किडनी बसवलेल्या रुग्णाचा मृत्यू, दोन महिन्यापूर्वी केली होती शस्त्रक्रिया

अमेरिकेतील डुकराचे हृदय बसवण्यात आलेला हा पहिला व्यक्ती होती. त्यांचा नावावर इतिहासात नोंद करण्यात आली होती. मात्र त्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे.

    काही वर्षांपूर्वी दोन पुरुषांमध्ये डुकराचे हृद्य प्रत्यारोपण करण्यात आले होते.पण त्या दोन्ही व्यक्तींचा काही महिन्यांमध्येच मृत्यू झाला होता. असाच प्रकार अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा घडला आहे. दोन महिन्यांआधी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्सच्या एका व्यक्तीमध्ये डुकराचे हृदयप्रत्यारोपण करण्यात आले होते. अमेरिकेतील डुकराचे हृदय बसवण्यात आलेला हा पहिला व्यक्ती होती. त्यांचा नावावर इतिहासात नोंद करण्यात आली होती. मात्र त्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे. निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील नातेवाईकांनी आणि रूग्णांलयाने याबाबत माहिती दिली आहे.

    डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, किडनी रिचर्डच्या शरीरात किमान 2 वर्षे व्यवस्थित काम करू शकते. डुक्कराची किडनी शरीरात प्रत्यारोपित करणारे रिचर्ड हे पहिले व्यक्ती होते. तर यापूर्वी डुकराची किडनी ब्रेन डेड व्यक्तीच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आली होती. रिचर्डचे यांच्यावर २०१८ मध्ये पहिल्यांदा किडनी प्रत्यारोपण करण्यात आली होती. पण त्यांची किडनी निकामी झाल्यानंतर त्यांना पुन्हा डायलिसिस करावे लागले. डायलिसिसमध्ये करताना अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागले. त्यानंतर डॉक्टरांनी डुकराची किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता.

    रिचर्ड यांच्या कुटूंबियांनी डॉक्टरांचे आभार मानले. तेव्हा ते म्हणाले, ‘डॉक्टरांमुळे आम्हाला रिचर्डसोबत आणखी काही वेळ घालवता आला. रिचर्ड या शस्त्रक्रियेसाठी तयार झाला जेणेकरून जगभरातील त्याच्यासारख्या इतर रुग्णांना जगण्याची नवी उमेद मिळावी’.

    शस्त्रक्रियेच्या एक महिन्यानंतर एप्रिलमध्ये, न्यू जर्सी येथील लिसा पिसानो नावाच्या महिलेचे अनुवांशिकरित्या सुधारित डुकराचे मूत्रपिंड देखील प्रत्यारोपण करण्यात आले. शिवाय हृदयाचे ठोके चालू राहावेत म्हणून तिला यांत्रिक पंप देखील बसवण्यात आला.अमेरिकेमध्ये सध्या सुमारे 1.10 लाख लोक अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. यातील बहुतेक रुग्ण हे किडनी प्रत्यारोपणाचे आहेत. अमेरिकेत दरवर्षी अवयव प्रत्यारोपणाअभावी 6 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होतो.