पुन्हा 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, भारतापर्यंत जाणवले हादरे (फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
अफगाणिस्तानात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.7 इतकी नोंदवण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार सकाळी 11.26 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचे केंद्र जमिनीपासून 255 किलोमीटर खोलीवर होते. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, भारताच्या काही भागातही त्याचे धक्के जाणवले. यापूर्वी 16 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानमध्ये 4.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. भूकंपाचा केंद्रबिंदू 36.51 उत्तर अक्षांश आणि 71.12 रेखांश पूर्वेला आणि 255 किलोमीटर खोलीवर होता.
पाकिस्तानच्या हवामान खात्याने (पीएमडी) सांगितले की, अफगाणिस्तान व्यतिरिक्त, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आणि वायव्य खैबर पख्तूनख्वा आणि पूर्व पंजाब प्रांतातील इतर अनेक भागात 5.4 तीव्रतेचा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. परंतु या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. पीएमडीच्या म्हणण्यानुसार, भूकंप 215 किलोमीटर खोलीवर झाला आणि त्याचा केंद्रबिंदू शेजारच्या अफगाणिस्तानच्या हिंदुकुश भागात होता.
नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून २५५ किलोमीटर खाली होता. त्याची तीव्रता 5.7 होती. त्याचे केंद्र अफगाणिस्तानमधील अश्कशमपासून 28 किलोमीटर दूर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दिल्ली-एनसीआरमध्येही भूकंपाचे हलके धक्के जाणवले. मात्र, भारतात त्याची तीव्रता खूपच कमी असल्याने काही लोकांना याची माहिती मिळू शकली नाही. अफगाणिस्तानला लागून असलेल्या पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात त्याची तीव्रता अधिक जाणवली. या भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीचे म्हणणे आहे की, या भूकंपाची तीव्रता जास्त होती, मात्र त्याचा भूपृष्ठावर फारसा परिणाम झाला नाही. याचे कारण भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून २५५ किलोमीटर खाली होता. सहसा रिश्टर स्केलवर 5.7 तीव्रतेच्या भूकंपाचा महत्त्वपूर्ण प्रभाव असतो, परंतु यावेळी जास्त खोलीमुळे कोणतेही नुकसान झाले नाही. भारताबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे किरकोळ धक्के जाणवले. तर जम्मू-काश्मीरमध्ये त्याची तीव्रता थोडी जास्त होती. भूकंपाचा केंद्रबिंदूही काबूलच्या ईशान्येला २७७ किलोमीटर अंतरावर होता. अशा परिस्थितीत पाकिस्तान आणि भारतात इतक्या दूरवरून आल्यानंतर त्याचा प्रभाव नगण्यच राहिला.
EQ of M: 5.7, On: 29/08/2024 11:26:38 IST, Lat: 36.51 N, Long: 71.12 E, Depth: 255 Km, Location: Afghanistan.
For more information Download the BhooKamp App https://t.co/5gCOtjdtw0 @DrJitendraSingh @OfficeOfDrJS @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia pic.twitter.com/6PsXboMuXc — National Center for Seismology (@NCS_Earthquake) August 29, 2024
सुमारे 40 दशलक्ष वर्षांपूर्वी भारतीय उपखंडाची युरेशियन प्लेटशी टक्कर झाली. त्यामुळे हिमालय पर्वत तयार झाला. आजही हा पर्वत दरवर्षी एक सेमी उंच वाढत आहे. या हालचालीमुळे येथे अनेकदा भूकंप होता.
तसेच अफगाणिस्तान हिंदुकुश पर्वतांमध्ये वसला आहे आणि हिंदुकुश पर्वत अल्पाइन बेल्टचा भाग आहेत. पृथ्वीचा अल्पाइन पट्टा हा भूकंपप्रवण प्रदेशांपैकी दुसरा सर्वात मोठा प्रदेश आहे. पहिला क्रमांक पॅसिफिक रिंग ऑफ फायर आहे.
जगतालेच्या 70 टक्क्यांहून अधिक सक्रिय ज्वालामुखी पॅसिफिक रिंग ऑफ फायर प्रदेशात आहेत. अफगाणिस्तान, जो अल्पाइन पट्ट्याचा भाग आहे, सक्रिय ज्वालामुखी आणि सक्रिय टेक्टोनिक प्लेट्स असलेला भूभाग आहे. तसेच इथुनमधून अनेक फॉल्ट लाइन्स (भूकंपामुळे जागृत होतात). यातल्या फॉल्ट लाइन्सची नावे आहेत चमन फॉल्ट, हरिरुद फॉल्ट, सेंट्रल बदक्शान फॉल्ट आणि दरवेझ फॉल्ट.