भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव रणधीर जयस्वाल (फोटो सोजन्य : सोशल मीडिया)
Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगानिस्तानवर हवाई हल्ला; सात दहशतवादी अड्ड्यांना केलं उद्ध्वस्त
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात, पाकिस्तानच्या रमजानच्या महिन्यात केलेली लष्करी कारवाई अत्यंत दुर्वैवी असल्याचे भारताने म्हटले आहे. भारताने म्हटले आहे पाकिस्तान देशांतर्गत समस्यांपासून जगाचे लक्ष हटवण्यासाठी वारंवार शेजारील देशांविरोधात पावले उचलत आहे. अफगाणिस्तानच्या (Afghanistan) सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला पाठिंबा देत भारताने प्रादेशिक शांतता राखणे ही प्रत्येक देशाची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानच्या हल्ल्यात महिला आणि मुलांसह अनेक निरापराक्ष लोकांचा बळी गेला आहे. यावरही भारताने चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा हल्ला अमानवीय कृत्य असल्याचे भारताने संबोधले आहेत. भारताने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तानच्या शेजारील देशांविरोधात कारवाया आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन आहे. पाकिस्तान देशांतर्गत समस्यांचे निराकरण करण्याऐवजी इतर देशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहे.
पाकिस्तानी हवाई दलाने रविवारी (22 फेब्रुवारी) अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतातील बारमल जिल्ह्यातील एका धार्मिक मदरशावर हवाई हल्ला केला होता. पाकिस्तानने या हल्ल्यात तहरीक-ए-तालिबान(टीटीपी)च्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्यासाठी हल्ला केला असल्याचे म्हटले होते. या हल्ल्यात महिला आणि मुलांसह अनेकांचा बळी गेला.
दरम्यान अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने पाकिस्तानच्या या हल्ल्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच पाकिस्तानने दहशतवादी तळांवर हल्ला केलाचा दावना फेटाळला असून लष्करी तळांऐवजी मदरसे आणि लोकांच्या निवासस्थानवर हल्ला करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. तसेच अफगाणिस्तानने पाकिस्तानला हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देणार असल्याचाही इशारा दिला आहे.
सध्या दोन्ही देशांतील या तणावामुळे पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमांवर राहण्याऱ्या सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताने अफगाणिस्तानला प्रादेशिक शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. या हल्ल्यामुळे आतंरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ISI चं कंबरडं मोडणार! नेपाळमधील पाकिस्तानी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारताची मोठी खेळी
Ans: भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या अफगाणिस्तानवर हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. रमजनच्या पवित्र सणात महिला आणि मुलांसह निरापराध नागरिकांवरील हल्ला अमानवीय कृृत्य असल्याचे म्हटले आहे. तसेच पाकिस्तान अंतर्गत समस्यांपासून जगाचे लक्ष्य विचलित करण्यासाठी शेजारील देशांविरोधात पावले उचलत असल्याचे म्हटले आहे.
Ans: अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या हल्ल्यावर संताप व्यक्त केला असून प्रत्युत्तराची धमकी दिली आहे.
Ans: भारताने अफगाणिस्तानला प्रादेशिक शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.






