नवी दिल्ली – ऐतिहासिक टायटॅनिक (Titanik Ship) जहाजाचे समुद्रातील अवशेष पाहण्यासाठी पाणबुडीतून ( Tiatan submarine) पर्यटन करण्याचा निर्णय 5 जणांना चांगलाच महागात पडलाय. टायटन पाणबुडीतून या पर्यटनासाठी गेलेल्या पाचही जणांचा मृत्यू झालेला आहे. हे पाचही जण अब्जाधीश होते. पाकिस्तानी वंशाचे शहजाहा दाऊद (Shahjada Dawood)आणि त्यांचा 19 वर्षांचा मुलगा सुमाने दाऊद हेही या पाणबुडीत होते. हामिश हार्डिंग, पॉल हेन्री नार्डियोलेट आणमि ओशियन गेटचे सीईओ स्टॉकटन रश यांचा समावेश आहे. ही पाणबुडी ऑपरेट करणारी कंपनी ओशियन गेट या कंपनीनं अधिकृतरित्या हे जाहीरत करत या पाचही जणांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सहा दिवसांपूर्वी 18 जून रोजी टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी पाणबुडीतून हे पाचही जणांनी प्रवास सुरु केला होता. प्रवास सुरु केल्यानंतर 1. 45 तासांत या पाणबुडीचा संपर्क तुटला होता.
The five people aboard the missing Titan submersible died in a ‘catastrophic’ event, a Coast Guard official said, adding that debris from the vessel was found near the wreckage of the Titanic https://t.co/dmirgq5Bmm pic.twitter.com/tg2g3ukq5x
— Reuters (@Reuters) June 23, 2023
न्यूज एजन्सी रॉयटरनं दिलेल्या वृत्तानुसार, तपास पथकाला टायटॅनिक जहाजाच्या अवशेषांजवळच जवळच या पाणबुडीचेही अवशेष सापडले आहेत. आता पाणबुडीचे अवशेष मिळाल्यानंतर विशेषज्ञ या प्रकरणाचा तपास करीत असल्याचं यूएस कोस्टच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या पाणबुडीचा शोध कॅनडाच्या एका जहाजात असलेल्या रोबोटच्या सहाय्याने लावण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
या पाच अब्जाधीशांपैकी चौघांनी या मृत्यूच्या प्रवासासाठी 2 कोटी रुपये तिकिट खरेदी केलं होतं. ओशनगेट कंपनीची ही पाणबुडी 18 जून रोजी टायटॅनिकच्या प्रवासासाठी निघाली होती. एकूण 8 तासांचा हा प्रवास होता. समुद्राच्या तळाशी असलेल्या टायटॅनिक जहाजाजवळ जाण्यासाठी दोन तास लागणार होते. त्यानंतर तिथं फिरुन ही पाणबुडी वर येणार होती.
ही पाणबुडी बेपत्ता झाल्यानंतर अमेरिका, कॅनडा यासह अनेक देशांचे नौदल आणि हवाईदलाच्या वतीनं या पाणबुडीचा शोध घेण्यात येत होता. समुद्रात खोल पाण्यात दृश्यमानता नसते, त्यामुळे पाणबुडी शोधण्यात प्रचंड अडचणी आल्या, असं अमेरिकन कोस्ट गार्डच्या वतीनं सांगण्यात येतंय.