फोटो सौजन्य: iStock
नवी दिल्ली: रशियन जासूस समजल्या जाणाऱ्या व्हाईट बेलुगा व्हेलचा मृत्यू झाला आहे. हवाल्दिमिर असे या व्हाऊट व्हेलचे नाव होते. मीडिया रिपोर्टनुसार 31 ऑगस्ट रोजी नॉर्वेच्या रिवासिका खाडीत तिचा मृतदेह आढळला. खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या लोकांना व्हेलचा मृतदेह तरंगताना दिसला. ही व्हाईट व्हेल 14 फूट लांब होती, जिचे वजन 1,225 किलो होते. तिचा मृतदेह क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मोठ्या बोटीच्या धडकेने मृत्यू झाल्या संशय व्यक्त करण्यात येत आहे.
ह्वाल्दिमीर व्हेलला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. या व्हेलबद्दल जगाला 2019 मध्ये माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार या व्हेलला प्रथम नार्वेमधील इंगोया बेटाच्या किनाऱ्यावर पाहिले गेले. ज्या भागात व्हेल आढळत नाही त्या ठिकाणी बेलुगा व्हेलचे दिसणे आश्चर्याचे होते. त्यामुळे तिच्यावर लक्ष देण्यात येऊ लागले. व्हेलची जवळून पाहणा देखील करण्यात आली होती. त्यावेळी तिच्या गळ्यात रशियन सेंट पीटर्सबर्गनावाचा पट्टा दिसला. तसेच तिच्या शरिरावर कॅमेरे आणि काही मशीन्स देखील होत्या. ज्यामुळे तिला रशियाचा जासूस म्हणून ओळखले जाऊ लागले.
व्हेलचे नाव राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या नावावर आहे
मीडिया रिपोर्टनुसार, ही बेलुगा व्हेल प्राण्यांना हेर बनवण्याच्या रशियन प्रकल्पाचा भाग असावा असा दावा करण्यात आला होता. मात्र रशियाने हा आरोप कधीही मान्य केला नाही. व्हेलला नार्वेमध्ये Hval म्हणतात. यानंतर व्हेल आणि रशियन राष्ट्राध्यक्षांची नावे एकत्र करून या व्हेल ला व्हाल्दिमिर स्पाय व्हेल म्हटले जाऊ लागले. बेलुगा व्हेल सामान्यतः थंड आर्क्टिक महासागरात राहतात. पण ह्वाल्दिमीर माणसांमध्ये सहज राहत असे. ती माणसांसोबत डॉल्फिनसारखी खेळत असायची
ह्वाल्दिमीर शांत स्वभावाची होती
ह्वाल्दिमीरचे संरक्षण करणाऱ्या नॉर्वेजियन एनजीओ मरीन माइंडने सांगितले की, गेल्या काही वर्षांत ती अनेक किनारी भागात दिसला होता. व्हेल खूप शांत स्वभावाचा होती हे लवकरच आमच्या लक्षात आले. तिला लोकांशी खेळायला आवडायचे. तिने हाताच्या संकेतांवरही प्रतिक्रिया दिली. एनजीओने सांगितले की ह्वाल्दिमीरला लोकांशी खेळायला आवडायचे. नॉर्वेतील हजारो लोकांचे तिच्यावर प्रेम करायचे. तेथील लोकांसाठी व्हेलचा मृत्यू हृदयद्रावक आहे. मरीन माईंडने सांगितले की, तिच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी शुक्रवारी तिला शेवटचे पाहिले होते. तेव्हा ती एकदम ठीक होती. तिच्या मृत्यूचे कारण जाणून घ्यायचे आहे. कारण साधारणपणे, बेलुगा व्हेलचे सरासरी वय 60 वर्षे मानले जाते. मात्र, व्हाल्दिमिर काळाच्या आत मरण पावली. तसेच तिच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत.