अमेरिकेच्या 'या' धमकीमुळे घाबरले सौदी अरेबिया; BRICS मध्ये सामील होण्याचा निर्णय स्थगित ( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉश्गिंटन: इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरबने ब्रिक्समध्ये सामील होण्याचा निर्णय स्थगित केला आहे. ब्रिक्स गटात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यां देशांचा समोवेश आहे. ब्रिक्सने 2023 मध्ये विस्ताराच्या अंतर्गत सौदी अरब, मिस्र, इराण, यूएई, आणि इथिओपियाला सदस्यत्वासाठी निमंत्रण दिले होते. इतर देशांनी हे निमंत्रण स्वीकारलेले आहे. मात्र, सौदी अरेबियाने अद्याप यावर अंतिम निर्णय घेतलेला नाही. यामागचे कारण म्हणजे अमेरिकेचा असलेला दबाव असल्याचे म्हटले जात आहे.
अमेरिकेचा दबाव आणि ट्रम्पचे विधान
सौदी अरेबियाच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला चेतावणी दिली आहे की, जर ब्रिक्स देशांनी अमेरिकन डॉलरला पर्याय म्हणून स्वतःची चलनप्रणाली विकसित केली, तर अमेरिका या देशांवर 100% टॅरिफ लागू करेल. अमेरिकन डॉलरचा जागतिक वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी अमेरिका ब्रिक्सच्या विस्ताराला नेहमीच विरोध करत आले आहे. त्यामुळे सौदी अरेबियावर अमेरिकेचा दबाव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सौदी अरेबिया आणि ब्रिक्सचे संबंध
मिळालेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियाने यापूर्वी ब्रिक्ससोबत अनौपचारिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र, पूर्ण सदस्यत्वासाठी अद्याप सौदी अरेबिया राजी झालेला नाही. ऑक्टोबर 2023 मध्ये रशियातील कझान येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान सौदी अरेबियाच्या सहभागाबाबत संभ्रम होता. रशियाच्या क्रेमलिनच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले होते की, सौदी अरेबियाचा निर्णय नंतर जाहीर केला जाईल. मात्र, अद्याप अमेरिकेच्या दबावामुळे सौदी अरेबियाने अद्याप उत्तर दिलेले नाही. सध्या ब्रिक्सचे अध्यक्षपद रशियाकडे आहे.
भविष्यातील दिशा
सौदी अरेबियाचा ब्रिक्समध्ये प्रवेश पुढील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर अवलंबून आहे.
सध्या सौदी अरेबियाचा निर्णय जागतिक राजकारणात नवे ताणतणाव निर्माण करत आहे. अमेरिकेच्या धोरणांपासून स्वतःला वेगळे ठेवत सऊदी अरब ब्रिक्समध्ये सामील होईल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.