Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत भारतीयांचा श्वास गुदमरतोय? ४०% लोक देश सोडण्याच्या तयारीत; नेमकं कारण काय?

Indian-Americans Leaving US : एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अनेक भारतीयांना आता अमेरिका सोडून मायदेशी परतण्याची ओढ लागली आहे. कार्नेगीच्या रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 22, 2026 | 09:17 AM
Why Indian-American Leaving US

Why Indian-American Leaving US

Follow Us
Follow Us:
  • ‘American Dream’ चा मोह सुटला
  • ४०% भारतीय देश सोडण्याच्या तयारी
  • कार्नेगीच्या अहवालाने जगभरात खळबळ
वॉशिंग्टन : एकेकाळी भारतीयांसाठी स्वप्नांची दुनिया मानला जाणार अमेरिका (America) आता लोकांना नको झाल्याचे चित्र दिसत आहे. कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशन पीस (२०२६) च्या ताज्या रिपोर्टनुसार, अमेरिकेत स्थायिक भारतीयांना मायदेशी परतण्याची ओढ लागली आहे. तर काही भारतीय अमेरिका सोडून सुरक्षित आणि स्थिर भविष्याच्या शोधात दुसऱ्या देशांचा विचार करत आहेत. अमेरिकेतील सर्वात अल्पसंख्याक समुदाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीयांच्या या निर्णयाने जगभरात खळबळ उडाली आहे.

US Iran Conflict : ‘इराण धमक्यांपुढे झुकणार नाही’; गालिबाफ यांचा शांतता चर्चेपूर्वी ट्रम्प यांना मोठा इशारा

कार्नेगीच्या रिपोर्टनुसार, तब्बल ४०% भारतीय-अमेरिकन आता देश सोडून दुसरीकडे स्थायकि होण्याचा विचार करत आहेत. यामागे अनेक कारणे सर्वेक्षणातून समोर आली आहेत. जाणून घेऊयात नेमकी काय कारण आहेत.

राजकीय अस्थिरता आणि समाजिक धुव्रीकरण : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अत्यंत कठोर धोरणे अवलंबवली आहेत. यामुळे राजकीय कट्टरतेत वाढ होत असून सुमारे ५८% भारतीयांनी  अमेरिकेत असुरक्षितात जाणवू लागली आहेत. अमेरिकेतील समाजात सर्वसमावेशकता कमी होत होत चालली असल्याचे भारतीयांचे म्हणणे आहे.

ग्रीन कार्डसाठीची प्रतीक्षा : अहवालानुसार, अमेरिकेची इमिग्रेशन (Immigration) व्यवस्था अत्यंत गुंतागुंतीची झाली असून ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी लोकांना ३० ते ७० वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामुळे तरुण पिढीला त्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचे जाणवत आहे.

वाढती महागाई : गेल्या काही काळात अमेरिकेच्या न्यूयॉर्क, सॅन फ्रान्सिस्कोसारख्या शहरांमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. महागडे शिक्षण आणि आरोग्य सेवांमुळे मध्यमवर्गीय भारतीयांवर आर्थिक ताण पडत आहे.

रिव्हर्स मायग्रेशन आणि मायदेशी परतण्याची ओढ

  • अहवालानुसार, अमेरिका सोडण्याची इच्छा असणारे सर्वच लोक वैतागलेले नाहीत. तर भारतात नव्या संधीच्या शोधात आहेत.
  • गेल्या काही काळात बेंगळुरु, हैदराबाद आणि पुणे यांसारखी शहरे जागतिक स्तरावर टेक हब बनली आहेत. यामुळे लोकांना रोजगाच्या संधी दिसून येत आहे.
  • शिवाय आपल्या मातीत, संस्कृतीत राहण्याची, पालकांजवळ राहण्याची ओढळ लोकांना लागली आहे.
  • तसेच काही लोकांना  भारतात परतण्याची इच्छा नसून ते अमेरिकेला पर्यायी मार्ग शोधत आहेत. कॅनडा(Canada), ऑस्ट्रेलिया (Australia) किंवा दुबई अशा देशांमध्ये स्थायिक होण्याची आणि तेथील नागरिकत्व मिळवण्याची इच्छा भारतीयांनी व्यक्त केली आहे.
तज्ज्ञांच्या मते हे एक व्यापक बदलाचे लक्षण आहे. एकेकीळा अमेरिकन स्वप्नाला आपले अंतिम ध्येय मानणारे लोक आता मात्र डॉलरच्या मोहापेक्षा मानसिक शांतता, सामाजिक सुरक्षा आणि स्थिर भविष्याकडे वळताना दिसत आहेत.

US Iran Peace Talks : पाकिस्तानचा खेळ खल्लास! इराणशी थेट चर्चा करण्यास ट्रम्प स्वत: मैदानात, काय आहे नवा प्लॅन?

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतीय लोक अमेरिका का सोडू इच्छित आहेत

    Ans: कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशन पीस (२०२६) च्या अहवालानुसार, अमेरिकेतील राजकीय अस्थिरता, सामिजक धुव्रीयकरण, ग्रीन कार्डसाठी पाहावी लागणार वाट, महागडे शिक्षण आणि आरोग्य सेवा यामुळे अमेरिकन-भारतीयांवर आर्थिक ताण पडत आहे. याचमुळेच ४० टक्के भारतीयांना अमेरिका सोडण्याची इच्छा होत आहे.

  • Que: अहवालानुसार, आणखी कोणती कारणे भारतीयांना अमेरिका सोडायला भाग पाडत आहेत

    Ans: अहवालानुसार, अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांना मायदेशी परण्याची ओढ लागली आहे. तसेच भारताची वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था तरुणांना रोजगाराच्या संधीचे चित्र दाखवत आहे. बेंगळुरु, हैदराबाद यांंसारख्या शहरांमध्ये करियच्या संधीमुळे अनेक भारतीय अमेरिकेऐवजी मायदेशाला प्राधान्य देत आहेत. तसेच लोकांना आपल्या पालकांकडे राहण्याची आणि आपल्या संस्कृतीत राहण्याची इच्छा निर्माण होत आहे.

Web Title: American dream fading 40 people leaving us know why

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 09:17 AM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा
1

Italy Burqa Ban: युरोपमध्ये पुन्हा बुरखा बंदीची लाट; इटली सरकारच्या नव्या निर्णयाने जगभरात खळबळ, पंतप्रधान मेलोनींची घोषणा

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट
2

Canada EU: 51 वे राज्य बनवण्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यानंतर कॅनडा वळला युरोपकडे; मॅक्रॉन-कार्नी यांची भेट

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना
3

Donald Trump vs ICC: ट्रम्प प्रशासनाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयावर मोठा प्रहार; संपूर्ण आयसीसीवरच बंदी घालण्याची योजना

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा
4

SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.