युद्धबंदीनंतर गाझामध्ये पुन्हा विध्वंस; इस्रायली सैन्याचा गाझावर हल्ला, ८१ जणांचा मृत्यू
Israel’s attack on Gaza: गाझामध्ये युद्धबंदी लागू झालेली असतानाही इस्रायलने रात्रीच्या वेळी पुन्हा गाझापट्टीत हवाई हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. गाझामध्ये रात्रीच्या वेळी झालेल्या इस्रायली हल्ल्यांमध्ये 81 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेने हमासने त्यांच्या सैन्यावर हल्ला केल्याचा आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने केलेल्या युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
सुरुवातीला गाझामध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. नंतर, अनेक मुलांसह किमान ६० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. गाझामघील शिफा हॉस्पिटलचे संचालक मोहम्मद अबू सेलमिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये सात महिला आणि सहा मुलांसह आणखी २१ मृतदेह दाखल झाले आहेत. यामुळे गाझा हवाई हल्ल्यात मृतांची एकूण संख्या ८१ वर पोहोचली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे, कारण २० मुलांसह ४५ जखमींपैकी अनेक जण गाझा शहरातील रुग्णालयात गंभीर स्थितीत आहेत.
AFG vs PAK War : तुर्कीतील अफगाणिस्तान-पाकिस्तान शांतता चर्चा निष्फळ! सीमा वादावरून तणाव शिगेला
गाझामध्ये झालेल्या जोरदार हवाई हल्ल्यांनंतर इस्रायली लष्कराने पुन्हा युद्धबंदी लागू केल्याचे म्हटले आहे. इस्रायली लष्कर युद्धबंदी कराराचे पालन करत राहील परंतु कोणत्याही उल्लंघनाला “कठोर” प्रत्युत्तर देईल.असा इशारा दिला आहे. मंगळवारी, दक्षिण गाझामध्ये हमासने इस्रायली सैन्यावर केलेल्या गोळीबारानंतर, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सैन्याला गाझाविरुद्ध तात्काळ मोठ्या प्रमाणात हल्ले करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, इस्रायली सैन्याने रात्री उशिरा गाझावर मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ला सुरू केला, त्यासोबत टँक गोळीबार आणि स्फोटांचे आवाज आले. इस्रायल आणि हमास यांनी एकमेकांवर युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
आशिया दौऱ्यावर असलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलच्या लष्करी कारवाईचे समर्थन केले आहे. “गाझाच्या दक्षिणेकडील रफाह शहरात हमासच्या हल्ल्यात एका इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाल्यानंतर इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेले हल्ले योग्य आहेत.”असं ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, हमासने प्राणघातक गोळीबारात कोणताही सहभाग नाकारला आहे आणि इस्रायलवर युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
मध्य गाझा शहरातील देईर अल-बलाह येथील अल-अक्सा रुग्णालयाने इस्रायली हवाई हल्ल्यांनंतर रात्री सुमारे १० मृतदेह मिळाल्याची माहिती दिली आहे, ज्यात तीन महिला आणि सहा मुलांचा समावेश आहे. दक्षिण गाझा येथील खान युनिस येथील नासेर रुग्णालयाने सांगितले की इस्रायलीच्या पाच हल्ल्यांनंतर त्यांना १३ मुले आणि दोन महिलांसह २० मृतदेह मिळाले आहेत. मध्य गाझा येथील इतरत्र, अल-अवदा रुग्णालयाने म्हटले आहे की त्यांना १४ मुलांसह ३० मृतदेह मिळाले आहेत. हमासने रफाह गोळीबारात सहभाग नाकारला आणि युद्धबंदीची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली. हमासने दोन्ही बाजूंमध्ये मध्यस्थी करणाऱ्या देशांना इस्रायलवर लढाई थांबवण्यासाठी दबाव आणण्याचे आवाहन केले.






