फोटो सौजन्य: iStock
आज कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी वाहन चालक Google Maps चा वापर करत असतात. अगदी रोजच्या जीवनात सुद्धा गुगल मॅप्सचा वापर चांगलाच वाढला आहे. यामुळे रस्ता शोधणे जरी सोपे झाले असले तरी प्रत्येक वेळी हे ॲप तुम्हाला योग्य ठिकाणापर्यंत पोहचवेल असे नाही. कित्येकदा गुगल मॅपच्या वापरामुळे विचित्र अपघात होत असतात.असाच एक विचित्र अपघात गोव्यात झाला आहे.
गोव्यात अलिकडेच एक धक्कादायक घटना घडली, जिथे काही पर्यटकांनी त्यांची मारुती जिप्सी थेट नदीत घातली. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि सोशल मीडियावर लगेचच व्हायरल देखील झाली. पर्यटकांनी या घटनेसाठी गुगल मॅप्सला जबाबदार धरल्याने या घटनेचे लक्ष वेधले गेले, तर स्थानिकांनी आरोप केला की चालक दारू पिऊन गाडी चालवत होता.
नवीन Kawasaki Versys X 300 झाली लाँच, मिळाले एकापेक्षा एक भन्नाट अपडेट्स
ही दुर्घटना गोव्याच्या एका परिसरात रात्री सुमारे 2.30 वाजता घडली. रिपोर्टनुसार, कार चालवणारा पर्यटक चंदीगडचा रहिवासी होता आणि त्याने ही Maruti Gypsy भाड्याने घेतली होती. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार, तो आपल्या मित्रांसोबत फिरायला निघाला होता आणि Google Maps वर दाखवलेल्या दिशेनुसार गाडी चालवत होता. वाटेत त्याला एक फेरी रॅम्प दिसला, जो त्याला रस्ता असल्यासारखा वाटला. Google Maps ने “सरळ जात रहा” असा निर्देश दिला आणि ड्रायव्हरने त्याच दिशेने कार वळवली. मात्र त्याला हे लक्षात आलं नाही की तो रस्ता थेट नदीकडे जात आहे. काही सेकंदांतच कार नदीत कोसळली. सुदैवाने सर्वजण वेळेत कारमधून बाहेर पडले आणि सुरक्षित स्थळी पोहोचले.
ही घटना ‘In Goa 24×7’ या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली, जिथे लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि हजारो कमेंट्स केल्या. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं की Maruti Gypsy पूर्णपणे पाण्यात बुडालेली आहे आणि स्थानिक नागरिक तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर काहींनी ही Google Maps ची चूक आहे असे ठरवले तर बहुतेकांनी याला पर्यटकांची बेफिकिरी आणि मद्यधुंद अवस्थेत ड्रायव्हिंगचा परिणाम म्हटलं.
125cc सेगमेंटमध्ये ‘या’ बाईक्सचा नाद करायचा नाही! ग्राहकांची खरेदीसाठी लागते भलीमोठी लाईन
Maruti Gypsy मध्ये दमदार इंजिन, मॅन्युअल ट्रान्समिशन आणि हाय ग्राउंड क्लीअरन्स अशी प्रमुख फीचर्स दिली आहेत. यासोबतच सुरक्षितता, आराम आणि मनोरंजन यांसाठी अनेक उत्तम फीचर्सही आहेत, जसे की एअरबॅग, एअर कंडिशनर आणि म्युझिक सिस्टीम. ही एक 8-seater SUV आहे, जी 4×4 ड्राइव्हट्रेनसह येते, त्यामुळे ती ऑफ-रोडिंग आणि खराब रस्त्यांवरही उत्कृष्ट परफॉर्मन्स देते.






