जर तुम्ही जगातील सर्वात अनोखा परफ्यूम खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्कने (Elon Musk ) नवीन परफ्यूम ब्रँड आणला आहे. बर्ण्ट हेअर नावाच्या या परफ्यूमबद्दल इलॉन मस्कचा दावा आहे की हा “पृथ्वीवरील सर्वोत्तम सुगंध” आहे.
या परफ्यूमबद्दल इलॉन मस्कने ट्विटरवर माहिती शेअर केली आहे. एलोन मस्क सांगतात की हा परफ्यूम ऑम्निजेंडर असेल, म्हणजेच पुरुष, महिला आणि इतर सर्व लिंगांचे लोक ते वापरू शकतात. त्याची किंमत 100 डॉलर (सुमारे 8400 रुपये) आहे. शिपिंग शुल्क अतिरिक्त असेल. तर लोक या परफ्यूमसाठी क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसेही देऊ शकतात. यासाठी शिपिंग शुल्क 3,000 रुपये असेल.
[read_also content=”‘फ्रोजन प्लॅनेट २’ सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस https://www.navarashtra.com/movies/frozen-planet-2-series-will-soon-meet-the-audience-nrab-335316.html”]
टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे प्रमुख इलॉन मस्क यांनी सप्टेंबरमध्ये परफ्यूम मार्केटमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली तेव्हा लोकांना वाटले की तो विनोद करत आहे. त्याच्या स्टाइलनुसार ट्रोल करण्यासाठी त्याने बर्ण्ट हेअरसारखा ब्रँड लॉन्च केला आहे. तसे, एलोन मस्कने यापूर्वीच अशी उत्पादने
या परफ्यूमची खासियत सांगताना इलॉन मस्क यांनी ट्विट केले की, ‘हा विरुद्ध इच्छांचा परफ्यूम आहे’. हा एक असा परफ्यूम आहे, जो तुम्हाला गर्दीतून वेगळे बनवतो, तुम्ही विमानतळावरून जात असतानाही लोकांचे लक्ष वेधून घेतो. कंपनीने त्याच्या 10,000 वायल्या विकल्याचा दावा केला जात आहे.