इलॅान मस्कच्या न्यूरालिंकनं केली कमाल, मानवी मेंदूमध्ये बसवली चिप; फोन आणि लॅपटॉप स्पर्श न करताही काम करणार

सध्या या चाचणीचा उद्देश वायरलेस ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेसवर काम करणे हा आहे. यामध्ये सर्जिकल रोबोट्स आणि इम्प्लांटच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्यात आले आहे.

    इलॅान मस्कच्या (Elon Musk) न्यूरालिंकने मोठी कामगिरी केली आहे. न्यूरालिंकने मानवी मेंदूवर एक चिप बसवली आहे. खुद्द इलॉन मस्क यांनी ही माहिती दिली असून, ज्या व्यक्तीच्या मेंदूवर चिप बसवण्यात आली आहे त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांनी सांगितले. या उत्पादनाचे नाव आहे टेलीपॅथी. ज्यांचे हात पाय काम करत नाहीत त्यांच्यासाठी हे वरदान ठरू शकते.

    इलॅान मस्कच्या न्यूरालिंकने उत्तम काम केले आहे. मानवी मेंदूमध्ये पहिल्यांदाच चिपसेट बसवण्यात आले. खुद्द इलॅान मस्क यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर (जुने नाव ट्विटर) पोस्ट करून ही माहिती दिली. त्यावर बरेच दिवस काम सुरू होते आणि सप्टेंबरमध्ये कंपनीला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून चाचणीसाठी मंजुरी मिळाली. यांनी सांगितले तसेच, X वर पोस्ट करून, मस्कने न्यूरालिंकच्या उत्पादनाचे नाव आणि त्याचे फायदे सांगितले आहेत.

    चिपचे काय आहेत फायदे

    न्यूरालिंकच्या उत्पादनाला टेलिपॅथी असे नाव देण्यात आले आहे. याबाबत इलॉन मस्क म्हणाले की, ज्यांना हात-पाय नाहीत किंवा काम करत नाहीत अशा लोकांसाठी हे खूप उपयुक्त ठरेल. त्याच्या मदतीने, वापरकर्ते त्यांच्या मनाचा वापर करून संगणक आणि स्मार्टफोन नियंत्रित करण्यास सक्षम असतील. त्यांनी सांगितले की कल्पना करा की प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग त्यांच्या मदतीनेच संवाद साधू शकतील.

    सध्या या चाचणीचा उद्देश वायरलेस ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेसवर काम करणे हा आहे. यामध्ये सर्जिकल रोबोट्स आणि इम्प्लांटच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्यात आले आहे.