फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नवी दिल्ली: आफ्रिकन देश नायजेरियामध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. एक तेलवाहू टॅंकरने दुसऱ्या वाहनाला जोरदार टक्कर दिली. यामुळे टॅंकरला आग लागून भयंकर स्फोट झाला. या स्फोटात 48 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. देशाच्या आपत्कालीन प्रतिसाद संस्थेने या घटनेची माहिती दिली. उत्तर-मध्य नायजरिया राज्यात हा स्फोट झाला. उत्तर-मध्य नायजरियात इंधनाने भरलेला ट्रक प्रवासी आणि गुरे घेऊन जाणाऱ्या वाहनाला धडकला, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेने सांगितले.
नायजरियाचेआपत्कालीन व्यवस्थापन संस्थेचे महासंचालक अब्दुल्लाही बाबा-अरब यांनी सांगितले की, टँकर उत्तर-मध्य नायजर राज्याच्या अगाई प्रदेशाकडे जात होता. ज्याने प्रवास्यांनी आणि गुरांनी भरलेल्या वाहनाला टक्कर दिली. ज्यामध्ये किमान 50 गुरे जिवंत जाळाले. नायजेरिया तेल टंचाईशी झगडत असताना ही दुर्घटना घडली. देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये तेलासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
नायजेरियाच्या सरकारी मालकीच्या कंपनी NNPC लिमिटेडने गेल्या आठवड्यात गॅसोलीनच्या किमतीत किमान 39% वाढ केली. वर्षभरातील ही दुसरी मोठी वाढ आहे. दरम्यान, देशातील अनेक भागात इंधनाचा तुटवडा असून, त्यामुळे लोकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. नायजेरियात रेल्वे नेटवर्क नसल्यामुळे माल वाहतूक करण्यासाठी ट्रकचा वापर करावा लागतो. त्यामुळे आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या नायजेरियातील बहुतांश मुख्य रस्ते आणि महामार्गांवर असे अपघात होत असतात. नायजेरियाच्या फेडरल रोड सेफ्टी कॉर्प्सच्या मते, 2020 मध्ये पेट्रोल टँकरचे 1,531 अपघात झाले, ज्यामध्ये एकूण 535 लोकांचा मृत्यू झाला तर 1,142 जण जखमी झाले.
Emergency situation beside Agaie, along Agaie Bida road, Niger state. Tanker fell and led to the burning of several vehicles. Medical attention needed @FRSCNigeria @daily_trust @MobilePunch @ARISEtv pic.twitter.com/PqvMVzlHhl
— Mansur A. Oladele (@Ibn_Hussayn) September 8, 2024
मृतदेह सामूहिकपणे पुरले
40 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्यानंतरच्या निवेदनात असे म्हटले आहे की अपघातात अतिरिक्त मृतदेह सापडले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्व मृतदेह सामूहिकरित्या पुरण्यात आले आहेत. नायजर राज्याचे गव्हर्नर मोहम्मद बागो यांनी बाधित भागातील रहिवाशांनी शांत राहावे आणि रस्ता वापरकर्त्यांना “नेहमी सतर्क राहावे आणि जीवन आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी रस्ते वाहतूक नियमांचे पालन करावे” असे सांगितले.