फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीनाला २१ वर्षांची शिक्षा; तसेच त्यांच्या मुलाला आणि मुलीलाही सुनावली शिक्षा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Sheikh Hasina Verdict : ढाका येथे गुरुवारी बांगलादेशच्या ( Bangladesh) माजी पंतप्रधान शेख हसीनाविरुद्धच्या (Sheikh Hasina) भ्रष्टाचार प्रकरणांवर ऐतिहासिक असा निकाल देण्यात आला. अनेक आठवड्यांपासून सुरू असलेल्या सुनावणीनंतर विशेष न्यायाधीश-५ मोहम्मद अब्दुल्ला अल मामून यांच्या न्यायालयाने जमीन घोटाळ्याशी संबंधित तीन वेगळ्या गुन्ह्यांमध्ये हसीना यांना सात-सात वर्षे अशी एकूण २१ वर्षांची शिक्षा सुनावली. या संपूर्ण कारवाईला बांगलादेशमध्येच नव्हे तर दक्षिण आशियातही मोठ्या राजकीय घडामोडींचा टप्पा मानले जात आहे.
या खटल्यांचे मूळ भ्रष्टाचार विरोधी आयोगाच्या (ACC) जानेवारी २०२४ मधील चौकशीत असल्याचे नोंदवले गेले. आयोगाने असा दावा केला होता की शेख हसीना यांनी आपल्या पदाचा वापर करून ढाक्याच्या पूर्वाचल भागातील सरकारी जमीन कुटुंबाच्या नावे बेकायदेशीरपणे मिळवली. न्यायालयाने आजच्या निकालात हे गंभीर आरोप योग्य ठरवले आणि सरकारी प्रक्रियेचे उल्लंघन करून जमीन वाटप करण्यात आल्याचे स्पष्ट केले. ही किमान तीन प्रकरणे असून उर्वरित तीन आरोपांवरील निर्णय १ डिसेंबरला देण्यात येणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Radar Proof : युद्धाच्या पार्शवभूमीवर ड्रॅगनचा आश्चर्यकारक दावा; लुफा तंत्रज्ञानामुळे गुप्तचर विमान होऊ शकते पूर्णपणे ‘अदृश्य’
या संपूर्ण प्रकरणात हसीना यांच्याबरोबर त्यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय आणि मुलगी सायमा वाजेद पुतुल यांच्याही नावांचा समावेश होता. न्यायालयाने सजीब वाजेद यांना ५ वर्षांचा तुरुंगवास आणि १,००,००० टाकाचा दंड, तर सायमा वाजेद यांना ५ वर्षांचा तुरुंगवास अशी शिक्षा सुनावली. न्यायालयाने असे नमूद केले की कुटुंबातील सर्व सदस्यांनी मंजुरी प्रक्रियेवर प्रभाव टाकून जमीन वाटपात गंभीर अनियमितता केल्या.
दरम्यान, हसीना आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या सर्व आरोपांना राजकीय सूडबुद्धीचे स्वरूप असल्याचा दावा कायम ठेवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की देशातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर विरोधी गटांनी त्यांच्याविरुद्ध कट रचून एकत्रितपणे खटले दाखल केले आहेत. मात्र, विशेष न्यायालयाने या दाव्याला कोणतेही महत्व न देता सरकारी पुरावे, दस्तऐवजीकरण आणि आयोगाच्या चौकशी अहवालावर आधारित कठोर निर्णय दिला.
Her son #SajeebWazedJoy and daughter #SaimaWazedPutul was jailed for five years each in one of the three cases. Read more:https://t.co/ZLrGnGQJYi#Bangladesh #ShiekhHasina #ScamCase pic.twitter.com/QaQR3vG8Js — The Daily Star (@dailystarnews) November 27, 2025
credit : social media
विशेष बाब म्हणजे, या वर्षाच्या जुलै महिन्यात ढाका येथील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) विद्यार्थी आंदोलनातील हिंसाचारासाठी शेख हसीनांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. त्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईत अनेक विद्यार्थी ठार झाले होते. या प्रकरणात हसीनांची कायदेशीर टीम भारतात आश्रय घेतल्यापासून न्यायालयात हजरही राहत नाही, असे नोंदवले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : CEC Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार 2026 मध्ये स्वीकारणार इंटरनॅशनल ‘IDEA’ चा पदभार
या सर्वांच्या पार्श्वभूमीवर, ढाक्यातील अंतरिम सरकारने भारताकडे शेख हसीनाच्या प्रत्यार्पणाची अधिकृत मागणी केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याची पुष्टी केली असून, भारताकडून ही विनंती कायदेशीर प्रक्रियेतून तपासली जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुढील काही दिवसांत बांगलादेश-भारत संबंधांवर या प्रकरणाचा प्रभाव पडण्याची शक्यता वाढली आहे.
सध्या बांगलादेशात राजकीय अस्थिरतेची परिस्थिती असून, माजी पंतप्रधानांवर झालेल्या या कठोर कारवाईने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विशेष न्यायालयाचा हा निकाल देशातील भ्रष्टाचारविरोधी लढ्याला नवे वळण देणारा ठरला असून आगामी दिवसांत यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी चर्चा होण्याची शक्यता आहे.
Ans: तीन जमीन घोटाळा प्रकरणांमध्ये सरकारी जमीन बेकायदेशीरपणे मिळवल्याचा आरोप सिद्ध झाला.
Ans: सजीब वाजेद आणि सायमा वाजेद दोघांनाही प्रत्येकी ५ वर्षांचा तुरुंगवास.
Ans: भारताने बांगलादेशच्या प्रत्यार्पण विनंतीचे कायदेशीर पुनरावलोकन सुरू केले आहे.






