शी जिनपिंग (Xi Jinping) हे सलग तिसऱ्यांदा चीनचे (China) राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. शुक्रवारी त्यांनी तिसर्या कार्यकाळाला सुरुवात केली आहे. सलग तीन वेळा राष्ट्रपतीपद भूषवणारे ते देशातील पहिले नेते आहेत. 2013 मध्ये ते पहिल्यांदा देशाचे राष्ट्रपती झाले. यानंतर 2018 साली त्यांची दुसऱ्यांदा राष्ट्रपतीपदी निवड झाली. शुक्रवारी, वार्षिक नॅशनल पीपल्स काँग्रेसमधील प्रतिनिधींनी केंद्रीय लष्करी आयोगाचे अध्यक्ष म्हणून शी यांची नियुक्ती औपचारिकपणे जाहीर केली.
[read_also content=”अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट! तालिबानी गव्हर्नरचा मृत्यू, बांगलादेशात अनेक मुस्लिमांची घरे जाळली https://www.navarashtra.com/world/taliban-governor-of-afghan-province-killed-in-blast-nrps-375015.html”]
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शी जिनपिंग सोमवारी पक्षाच्या संसदीय बैठकीला संबोधित करणार आहेत. दुसरीकडे, शी जिनपिंग सोमवारी संध्याकाळीच पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला, चीनच्या कम्युनिस्ट पक्षाने एक मसुदा आराखडा सादर केला, ज्यामध्ये असे म्हटले आहे की कम्युनिस्ट पक्ष सरकारवर आपले थेट नियंत्रण वाढवणार आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या वार्षिक काँग्रेसमध्ये शी जिनपिंग यांनी त्यांची नवीन टीमही निवडली होती. ज्या अंतर्गत ली कियांग यांची चीनचे नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. यासोबतच ली शी, डिंग झ्युझियांग आणि काई क्यूई यांनाही स्थान देण्यात आले आहे.
ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या 20 व्या राष्ट्रीय काँग्रेस दरम्यान, शी जिनपिंग यांनी त्यांच्या पक्षावरील नियंत्रण आणखी मजबूत केले. दरम्यानच्या काळात त्यांनी आपल्या निकटवर्तीय आणि निष्ठावंतांना पक्षाच्या उच्च पदांवर नियुक्त केले होते. ऑक्टोबरमध्ये झालेल्या परिषदेनंतर, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना सरकारच्या पदांवर महत्त्वाच्या नियुक्त्या करते, ज्यामध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची नियुक्ती सर्वात महत्त्वाची असते. शनिवारी प्रतिनिधी चीनच्या नवीन पंतप्रधानांच्या नावाला मंजुरी देतील.