'PAK च्या कठपुतली सरकारशी बोलणे निरर्थक...' ; माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा शाहबाज सरकारला घरचा आहेर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. यानंतर दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला. शाहबाज शरीफ यांचे सरकारच लष्कराच्या इशाऱ्यावर कार्य करते हे स्पष्ट झाले. दरम्यान तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही हे मान्य केले आहे. त्यांनी शनिवारी शाहबाज सरकारला आरसा दाखवला आणि म्हटले की, त्यांना पाकिस्तानी लष्कराशी चर्चा करायची आहे. शाहबाज शरीफ यांच्या सरकारशी बोलणे निरर्थक आहे.
पाकिस्तानच्या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख इम्रान खान २०२३ पासून तुरुंगात आहे. २०२२ मध्ये त्यांचे सरकार पडले. त्यानंतर इम्रान खान यांच्यावर अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत.
इम्रान खान यांनी सोशल मीडियावर म्हटले की, पाकिस्तान मुस्लिम-लीग-नवाज (पीएमएल-एन) सरकारशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणे निरोपयोगी आहे. हे सरकार लष्कराच्या इशाऱ्यावर चालते. या सरकारने बेकायदेशीपणे फॉर्म-४७ ची स्थापना करुन दोन महिने वाया घालवले आहे. याचा उद्देश खोटे अधिकार बनवणे होता. या अधिकारांचा काहीही उपयोग नाही. इम्रान खान यांनी म्हटले की, चर्च फक्त त्यांच्याशी करण्यात येईल जो प्रत्यक्षात सत्तेत आहे. माझा उद्देश मजबूत आहे, यामुळे मला कोणत्याही अडचणींची भीती वाटत नाही.
इम्रान खान यांनी दावा केला आहे की, त्यांच्या आणि त्यांच्या पीटीआयपक्षाविरोधत सरकारने अनेक निराधार खटले दाखल केले आहेत. जबरदस्तीने अपहरण आणि जबरदस्तीने घेतलेल्या पत्रकार परिषद हे सर्व खटले केवळ पक्षातील सदस्यांना राजकारणातून हटवण्याच्या उद्देशने होते.
त्यांनी म्हटले की, या सर्व गोष्टींवरुन लक्षात येते की, पाकिस्तानमध्ये कायद्याचे राज्य संपुष्टात आले आहे. येथे केवळ जंगलराज सुरु आहे. इम्रान खान यांनी ९ मे २०२३ रोजी घडलेल्या घटनांशी संबंधित निराधार खटले पुन्हा एकदा सुरु झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, ९ मे रोजीची मोहीम खोटी होती. आजपर्यंतचे या मोहीमेचे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. गेल्या दोन वर्षात माझ्या आणि माझ्या पक्षाविरोधात खोटे आरोप दाखल करण्यात आले आहेत. याचा उद्देश पीटीआयला नष्ट करणे होता.
दरम्यान पीटीआयच्या प्रुमखांनी लष्करातील कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साध्यल्याच्या गोष्टीला मनाई केली आहे. इम्रान खान यांनी सांगितले की, माझ्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. मला अगदी माझ्या कुटुंबीयांशी, मुलांशी देखील बोलू दिलेले नाही. माझी या दोन वर्षात कुटुंबीयांशी एकदाही भेट झालेली नाही. पण तरीही मी माझ्या देशाच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे.
तसेच लष्करप्रमुख आसिफ मुनीर यांना मार्शल फील्ड बनवल्याबद्दलही इम्रान खान यांनी टीका केली होता. त्यांनी म्हटले होते की, मुनीर यांनी फील्ड मार्शलऐवजी स्वत:ला राजा पदवी द्यायला हवी होती, सध्या पाकिस्तानमध्ये जंगलराज सुरु आहे आणि जंगलाचा एकच राजा असतो.