Russia-Ukraine War: रशियाचा युक्रेनच्या प्रमुख शहरांवर मोठा हल्ला; तीन मुलांसह १३ जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
कीव: रशियाने शनिवारी (२४मे) रात्री युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात युक्रेनच्या विविध क्षेत्रांना लक्ष्य करण्यात आले. तसेच रशियाने कीववर शेकडो ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यात तीन मुलांसह १३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे माहिती समोर आली आहे. तसेच अनेजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी संताप व्यक्त केली आहे.
रशियाने कीव, खार्किव, मायकोलायव, टेर्नोपिल आणि खमेलनित्स्की या युक्रेनच्या प्रमुख शहरांवर हल्ले केले आहेत. हा गेल्या तीन वर्षापासून सुरु असलेल्या युद्धात सर्वात मोठा हवाई हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. परंतु युक्रेनच्या सैनिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हवाई दलाने २६६ ड्रोन आणि ४५ क्षेपणास्त्रे हवेतच हाणून पाडली आहे. पण काही ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना रोखण्यात यश आले नाही. यामुळे अनेक इमारतींचे आणि पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणाच नुकसान झाले आहे. दुसरीकडे रशियाने मोठा दावा केला आहे. रशियन सैनिकांनी म्हटले आहे की, त्यांनी अवघ्या चार तासांत ९५ युक्रेनियन ड्रोन हाणून पाडले आहे.
दरम्यान रशियाच्या हल्ल्यात युक्रेनची राजदानी कीवमध ११ जण जखमी झाले आहेत, तर खमेलनित्स्कीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल आहे. या हल्ल्याच्या एकदिवस आधीही रशियाने एक ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र युक्रेनवर डागले होते.
दरम्यान या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी अमेरिकेवरही संताप व्यक्त केला आहे. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखाली अमेरिकेच्या कमकुवत भूमिकेवर टीका केली आहे. तसेच रशियावर कठोर निर्बंध लादण्याचीही मागणी झेलेन्स्की यांनी केली आहे.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे चीफ ऑफ स्टाफ आंद्रेई येरमाक यांनी, दबावाशिया काहीही बदलाणार नाही असे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, रशिया आणि त्याचे मित्र पाश्चत्य राष्ट्रांमध्येही अशाप्रकारचे हत्याकांड घडवून आणतील. मॉस्कोकडे मोठी शस्त्रास्त्र क्षमत आहे, तोपर्यंत पुतिन लढतील. यामुळे रशियावर कठोर निर्बंध लादणे महत्त्वाचे आहे.
सध्या हा संघर्ष थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. काही दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांनी शांतता चर्चेचा प्रस्ताव मांडला होता. या चर्चेत ३० दिवसांच्या युद्धबंदीचा प्रस्ताव मांडण्यात आला. दोन्ही देशांनी या प्रस्तावला सहमती दर्शवली आणि या अंतर्गत प्रत्येकी हजार कैद्यांची सुटका देखील केली. परंतु पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये हल्ले सुरुच आहेत.