भारताचा मोठा विजय! पाकिस्तानच्या TRF संघटनेवर जगभरातून बंदीची मागणी, UNSC च्या रिपोर्टने पाकिस्तानला धक्का (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद : दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचा (Pakistan) संपूर्ण जगभरात भारताच्या जम्मू आणि काश्मीर येथील पहलगामच्या हल्ल्यानंतर पर्दाफाश झाला आहे. याच वेळी अमेरिकेने देखील पाकिस्तानला त्याची खरी किंमत दाखवली आहे. अमेरिकेने पाकिस्तानच्या “द रेझिस्टंट फ्रंट” (TRF) या संघटनेला जागतिक दहशतवादी संघटना घोषित केले असून यावर बंदी घातली आहे. आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) देखील यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
UNSC च्या देखरेख समितीने एक अहवाल जारी केला आहे. या अहवालात अधिकृतपणे TRF चा उल्लेख केला आहे. या अहवालात पाकिस्तानच्या TRF संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबादारी स्वीकारल्याचे नमूद करण्यात आले आहे.
केवळ एक वेळा नव्हे तर दोन वेळा TRF ने हल्ल्याची जबाबादारी घेतली असून याचा फोटो देखील प्रकाशित करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. शिवाय हा हल्ला लष्कर-ए-तैयबा (LeT) च्या पाठिंब्याने हा हल्ला घडवून आणला असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे.
दरम्यान संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीच्या देखरेख अहवालाला अत्यंत महत्वपूर्ण मानले जात आहे. या अहवालात TRF उल्लेख करण्यात आला असून हा निर्णय सर्व सदस्यांच्या मताने घेण्यात आला आहे. या अहवालामुळे पाकिस्तानचे TRF संघटनेला निर्दोष मुक्त करण्याचे सर्व दावे खोटे ठरत आहे. यावरुन संयुक्त राष्ट्र देखील TRF ला दहशतवादी संघटना मानते हे स्पष्ट होते.
आता भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून पाकिस्तानच्या TRF संघटनेवर बंदी घालण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. भारताने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत TRF चा वाढता प्रभाव आणि पाकिस्तानी लष्कराशी असलेला त्याच्या संबंधावर सविस्तर माहिती दिली आहे. भारत TRF वर औपचारिकरित्या बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे.