एअर इंडियाचे विमान थेट शत्रू राष्ट्राच्या हवाई हद्दीत शिरलं अन्..., जाणून घ्या विमानासोबत नेमकं काय घडलं? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतर अमेरिकेकडून मदतीचा हात; पंतप्रधान मोदींनीही…
दिल्लीहून अमृतसरसाठी उड्डाण केलेले हे विमान आपल्या नियमित मार्गावरून चालले होते. मात्र, प्रवासादरम्यान विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला, ज्यामुळे विमानाची दिशा-निर्देशन यंत्रणा प्रभावित झाली आणि विमान थेट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत दाखल झाले. विमान पाकिस्तानच्या हद्दीत शिरताच, तेथील हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेने विमानाचा मार्ग चुकला असल्याचा इशारा दिला. यानंतर पायलट आणि क्रू मेंबर्सनी विमान पुन्हा भारतीय हवाई हद्दीच्या दिशेने वळवले. सर्व सुरक्षा नियमांचे पालन करत विमानाला पुन्हा योग्य मार्गावर आणण्यात आले.
तांत्रिक समस्येमुळे आणि मार्ग बदलल्यामुळे विमानाला अमृतसरला पोहोचण्यास कमालीचा उशीर झाला. वेळापत्रकानुसार प्रवाशांना रात्री साडेदहाच्या सुमारास अमृतसरला पोहोचणे अपेक्षित होते, परंतु हे विमान सुमारे चार तास उशिराने आपल्या नियोजित स्थळी पोहोचू शकले. यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत राहावे लागले. सूत्रांनुसार, या विमानात सुमारे १५० प्रवासी स्वार होते. या संपूर्ण थरारादरम्यान सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. विमानाचे अमृतसर येथे सुरक्षित लैंडिंग झाल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.
दरम्यान DGCA ने या घटनेवर पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी तातडीने समन्वय साधला. नंतर विमान परत दिल्लीला नेण्यात आले. काही तासानंतर विमान पुन्हा अमृतसरसाठी रवाना झाले. परंतु वेळेत माहिती न दिल्याने संबंधित एअर ट्रॅफिक कंट्रोलर फ्लाईट क्रू यांच्यावर अंतरिम कारवाई केली आहे. पाकिस्तानने एप्रिल २०२५ पासून भारतासाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. पाकिस्तानच्या विमानांनाही भारतीय हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी नाही.
यापूर्वी १२ जून रोजी खराब हवामानामूळे पाकिस्तानचे फ्लाय जिना 9पी514 विमान भारतीय हवाई हद्दीत शिरले होते. लाहोर विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान त्याच्या निर्धारित मार्गावरुन भरकटले होते.
STORY | Air India plane strays into Pak airspace; DGCA takes action against air traffic controller, crew An Air India plane operating a flight from the national capital strayed into the Pakistan airspace on Monday night while manoeuvring a go-around at the Amritsar airport.… pic.twitter.com/bjqEorFBdu — Press Trust of India (@PTI_News) June 25, 2026






